Join us  

हार्दिक पंड्याबरोबरच्या अफेअरबाबत इशा गुप्ता काय म्हणाली, माहिती आहे का...

सध्याच्या घडीला हार्दिक आणि बॉलीवूडची अभिनेत्री इशा गुप्ता यांच्यामध्ये अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. आमच्यामध्ये अफेअर आहे, हे या दोघांनी जाहीर केले नसले तरी ते नाकारले देखील नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 4:36 PM

Open in App
ठळक मुद्देआतापर्यंत हार्दिकचे नाव बऱ्याच मॉडेल आणि अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे.

मुंबई : भारताच्या क्रिकेट संघात सध्याच्या घडीला हँडसम आणि बॅचलर आहे तो हार्दिक पंड्या. आतापर्यंत हार्दिकचे नाव बऱ्याच मॉडेल आणि अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे. सध्याच्या घडीला हार्दिक आणि बॉलीवूडची अभिनेत्री इशा गुप्ता यांच्यामध्ये अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. आमच्यामध्ये अफेअर आहे, हे या दोघांनी जाहीर केले नसले तरी ते नाकारले देखील नाही.

इशाला काही पत्रकारांनी हार्दिकबरोबर सुरु असलेल्या अफेअरबद्दल विचारलं. त्यावर इशा म्हणाली की, " माझ्या आणि हार्दिकमध्ये अफेअर आहे, ही गोष्ट मी नाकारत नाही. पण सध्याच्या घडीला लग्न करायचा माझा विचार नाही. आयुष्यात बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या गोष्टी वेळेत व्हायला हव्यात. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी मी लग्नाला प्रधान्य देणार नाही. जेव्हा मला लग्न करावेसे वाटेल, तेव्हा ही गोष्ट मी जाहीर करीन. "

टॅग्स :हार्दिक पांड्याइशा गुप्ता