Join us  

आम्ही आक्रमकतेवर ठाम होतो - रहाणे

अफगाणिस्तानविरुद्ध शुक्रवारी दोन दिवसात संपलेल्या एकमेव कसोटीत आम्ही आक्रमकतेवर ठाम होतो, अशी प्रतिक्रिया भारताचा काळजीवाहू कर्णधार अजिंक्य रहाणे याने विजयानंतर दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 5:33 AM

Open in App

बेंगळुरु अफगाणिस्तानविरुद्ध शुक्रवारी दोन दिवसात संपलेल्या एकमेव कसोटीत आम्ही आक्रमकतेवर ठाम होतो, अशी प्रतिक्रिया भारताचा काळजीवाहू कर्णधार अजिंक्य रहाणे याने विजयानंतर दिली. भारताने अफगाण संघाचा पदार्पणी सामन्यात एक डाव २६२ धावांनी सहज पराभव केला.नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणारा रहाणे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला, ‘हा विजय खरेतर विशेष आहे. देशाचे नेतृत्व करणे नेहमी सन्मानाची बाब असते. आम्ही या सामन्यात आक्रमक खेळण्याचे ठरविले होते.’ भारताच्या डावात शतकी खेळीचे योगदान देणारे सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन यांची अजिंक्यने स्तुती केली. तो म्हणाला, ‘सर्वांनी शानदार फलंदाजी केली. शिखर, मुरली, राहुल व हार्दिक यांची फलंदाजी वाखाणण्यासारखी होती. पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास अफगाणचा खेळ शानदार होता. हा संघ येथून पुढे भारारी घेईल, असा मला विश्वास आहे. त्यांचा वेगवान मारा अत्यंत प्रभावी होता. पहिल्या दिवशी उपाहारानंतर या गोलंदाजांनी संघाला यश मिळवून दिले.’ रहाणेने संघाचे विजयी फोटो काढताना अनोखा पुढाकार घेतला. अफगाणिस्तान संघाला त्याने पाचारण केले. विजयादाखल मिळालेला चषक त्यांच्या हातात देत चषकासह फोटो काढून घेण्याची विनंती केली.फलंदाजीचा आनंद लुटला - धवन९६ चेंडूत १०७ धावा ठोकणाऱ्या शिखर धवनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तो म्हणाला, सध्या फलंदाजीचा आनंद घेत आहे. हा सामना लवकर संपल्याने आयर्लंडविरुद्ध तयारीला वेळ मिळेल शिवाय काही दिवस चांगली विश्रांती घेता येईल.’कसोटी दर्जा मिळाल्याबद्दल धवनने अफगाण संघाचे कौतुक करीत हे खेळाडू वन डे प्रमाणे कसोटीतही लौकिक मिळवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारतीय क्रिकेट संघ