Join us  

आम्ही आखूड टप्प्याचा मारा समर्थपणे खेळलो - भुवनेश्वर कुमार

दक्षिण आफ्रिकेच्या यंदाच्या दौ-यात भारतीय फलंदाजांनी आखूड टप्प्याच्या मा-याला समर्थपणे तोंडे दिले आणि संघाच्या यशाचे हे एक महत्त्वाचे कारण आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने व्यक्त केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:29 AM

Open in App

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या यंदाच्या दौ-यात भारतीय फलंदाजांनी आखूड टप्प्याच्या मा-याला समर्थपणे तोंडे दिले आणि संघाच्या यशाचे हे एक महत्त्वाचे कारण आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने व्यक्त केली. पहिल्या टी-२० सामन्यात विजय मिळवल्यानंतर भुवनेश्वर म्हणाला, ‘दक्षिण आफ्रिकाने या लढतीत आखूड टप्प्याच्या माºयावर भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, पण ही रणनीती त्यांच्यावर उलटली. भारतीय संघ विदेश दौºयावर जातो त्यावेळी भारतीय फलंदाज शॉर्ट पिच मारा खेळण्यास सक्षम नसल्याचे म्हटल्या जाते. यावेळी मात्र असे चित्र अनुभवाला मिळाले नाही. आम्ही आखूड टप्प्याच्या चेंडूंना समर्थपणे तोंड दिले. रविवारी डावाच्या सुरुवातीच्या पाच-सहा षटकांमध्ये त्यांनी अनेक आखूड चेंडू टाकले, पण ही रणनीती त्यांच्यावर उलटली. आम्ही यावेळी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत एकदम विरुद्ध खेळलो. प्रतिस्पर्धी संघ आखूड टप्प्याचा मारा करण्यास इच्छुक आहे, पण त्याचा त्यांना लाभ होताना दिसत नाही.’टी-२० कारकिर्दीत प्रथमच पाच बळी घेणारा भुवनेश्वर म्हणाला, ‘मी वेगात बदल करण्यासाठी प्रयत्नशील असून वेगावर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे फटकेबाजी करणे कठीण झाले. खेळपट्टीनुसार गोलंदाजी करणे आवश्यक असते. उदाहरण द्यायचे झाल्यास, रविवारी आम्ही अनेक स्लोव्हर वन चेंडू टाकले. आमच्या रणनीतीचा हा एक भाग होता. दिशा व टप्पा यासह वेगावर नियंत्रण राखणे महत्त्वाचे असते.’ तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा भुवनेश्वर पहिला भारतीय ठरला आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८भुवनेश्वर कुमार