Join us  

Virat Kohli To Women Cricket Team: नो बॉल पडला, मॅच हरला म्हणून काय झाले... आम्हाला गर्व आहे; महिला संघाला 'विराट' पाठिंबा

भारतीय चाहत्यांसह महिला खेळाडू देखील निराश झाल्या होत्या. यावर भारतीय पुरुष संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त शाबासकी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 12:43 PM

Open in App

महिला वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला सेमी फायनलला मुकावे लागले आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये टाकलेल्या  नो बॉलवर सारे खापर फुटले असून यामुळे भारतीय महिला संघावर टीका होत होती. यावर विराट कोहलीने भारतीय संघाला मोठा पाठिंबा दर्शवत आम्हाला गर्व असल्याचे म्हटले आहे. 

ऑफ्रिकन संघाला शेवटच्या षटकात सात धावा हव्या होत्या. दीप्ती शर्मा बॉलिंग करत होती. दुसऱ्या चेंडूवर आफ्रिकेची फलंदाज त्रिशा २ धावा घेत असताना रन आऊट झाली. पाचव्या चेंडूवर मिगनन प्रीज कॅच आऊट झाली, परंतू तो नो बॉल होता. विकेट मिळाला नाही, परंतू एक रन जास्त गेला आणि फ्री हिटदेखील मिळाली. आता आफ्रिकेला दोन चेंडूंत दोन रन्स हवे होते. ते त्यांनी बनविले आणि भारताच्या हातून जिंकलेली मॅच गेली. याचसोबत सेमी फायनलमध्ये जाण्याचे मार्गही बंद झाले. 

भारतीय चाहत्यांसह महिला खेळाडू देखील निराश झाल्या होत्या. यावर भारतीय पुरुष संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त शाबासकी दिली आहे. मैदानावर सर्व काही दिले होते, यामुळे तुम्ही मान खाली घालून नाही तर वर करून चाला. आम्हाला तुमच्यावर गर्व आहे, अशा शब्दांत पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :विराट कोहली
Open in App