काय बोलताय तुम्ही..? विराटच्या खराब फॉर्मवर प्रश्न विचारताच कॅप्टन रोहित स्पष्टच बोलला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट अपयशी; ३ सामन्यांत केवळ २६ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 09:19 AM2022-02-12T09:19:19+5:302022-02-12T09:39:44+5:30

whatsapp join usJoin us
we are not worried about virat kohlis form says captain rohit sharma | काय बोलताय तुम्ही..? विराटच्या खराब फॉर्मवर प्रश्न विचारताच कॅप्टन रोहित स्पष्टच बोलला

काय बोलताय तुम्ही..? विराटच्या खराब फॉर्मवर प्रश्न विचारताच कॅप्टन रोहित स्पष्टच बोलला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण काम करत रन मशीन ठरलेल्या कोहलीला गेल्या २ वर्षांत शतक झळकावता आलेलं नाही. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विराटला एकदाही वीस धावांपुढे जाता आलं नाही. तीन सामन्यांत ८.६७ च्या सरासरीनं विराटनं २६ धावा केल्या. पहिल्या सामन्यात ८, दुसऱ्या सामन्यात १८ धावा करणाऱ्या विराटला तिसऱ्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे कोहलीच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

काल झालेला तिसरा एकदिवसीय सामना जिंकत भारतानं वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माला विराटच्या फॉर्मबद्दल विचारण्यात आलं. त्यावर विराटला विश्वास देण्याची गरज तुम्हाला वाटते का? तुम्ही काय बोलताय? असे प्रतिप्रश्न रोहितने विचारले. 'आम्ही विराटच्या फॉर्मवरून चिंतेत नाही. शतक होत नाही ही एक वेगळी गोष्ट आहे. नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्यानं दोन अर्धशतकं झळकावली. त्यामुळे काही चुकीचं घडतंय असं मला वाटत नाही. संघ व्यवस्थापनादेखील त्याच्या फॉर्मबद्दल चिंता वाटत नाही. खेळाडू म्हणून कशावर लक्ष्य केंद्रीत करायचं त्याची आम्हाला कल्पना आहे,' असं रोहित पुढे म्हणाला.

विराटचा धावांसाठी संघर्ष
विराट कोहलीला सलग ७व्या एकदिवसीय मालिकेत शतक झळकावता आलेलं नाही.  ( 2019 - WI Tour of IND, 2020 - AUS Tour of IND, 2020 - IND Tour of NZ, 2020 - IND Tour of AUS, 2021 - ENG Tour of IND, 2022 - IND Tour of SA, 2022 - WI Tour of IND*) भारतीय संघात एकदिवसीय क्रिकेटमध्ये १ ते ७ व्या क्रमांकावर सर्वाधिक भोपळ्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांत विराट चौथ्या क्रमांकावर आला. तो १५ वेळा शून्यावर बाद झाला आणि त्यानं सुरेश रैना व वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ ते ७व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक भोपळ्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट ( ३२) दुसऱ्या स्थानी सरकला आहे. सचिन तेंडुलकर सर्वाधिक ३४ वेळा शून्यावर बाद झाला आहे. ( Most Ducks for India) विराटनं वीरेंद्र सेहवागला ( ३१) आज मागे टाकलं.

Web Title: we are not worried about virat kohlis form says captain rohit sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.