Join us  

चान्स दिला तर भारतीय संघ 10 पैकी 9 वेळा हरवेल, ऑस्ट्रेलियन सलामीवीराने दिली कबुली

सध्याच्या घडीला भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियन संघामध्ये बरेच अंतर असून, भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 5:00 PM

Open in App
ठळक मुद्देतिस-या वनडेमध्ये भारताने 294 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य आरामात पार करुन मालिकेत 3-0 विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियन संघाला ज्या संधी मिळाल्या त्या विजयामध्ये बदलता आल्या नाहीत.

बंगळुरु - सध्याच्या घडीला भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियन संघामध्ये बरेच अंतर असून, भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ आहे. ऑस्ट्रेलियन सलामीवीर अॅरॉन फिंचने प्रसारमाध्यमांशी बोलताना ही कबुली दिली.  दिली.  भारताबरोबर जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला हे अंतर भरुन काढावे लागेल असे फिंचने सांगितले.

तिस-या वनडेमध्ये भारताने 294 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य आरामात पार करुन मालिकेत 3-0 विजयी आघाडी घेतली. भारताच्या विजयामुळे अॅरॉन फिंचची 124 धावांची शतकी खेळी वाया गेली. त्याचे दु:ख फिंचच्या बोलण्यातून जाणवत होते. पोटरीच्या दुखापतीमुळे फिंचला कोलकाता आणि चेन्नई या दोन वनडेमध्ये खेळता आले नाही.

ऑस्ट्रेलियन संघाला ज्या संधी मिळाल्या त्या विजयामध्ये बदलता आल्या नाहीत. तुम्हाला चांगला खेळ करण्याबरोबरच सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल. तुम्हाला सामना जिंकायची संधी मिळते तेव्हा ती वाया घालवून चालणार नाही असे फिंचने ऑस्ट्रेलियन वेबसाईटशी बोलताना सांगितले. पहिल्या तीन सामन्यांमध्ये आम्ही चांगल्या संधी होत्या. पण भारताला थोडासा जरी चान्स मिळाला तर ते तुम्हाला 10 पैकी 9 वेळा पराभूत करतील.

इथल्या वातावरणात भारताविरुद्ध जिंकण्यासाठी तुम्हाला 100 टक्के खेळ करावा लागेल. तुम्ही तुमच्या क्षमतेच्या 90 टक्के खेळ करुन भागणार नाही असे फिंचने सांगितले. प्रत्येक संघ परदेशात जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा तुम्ही पराभूत होत असता तेव्हा तुमचा आत्मविश्वास कमी होतो असे फिंचने सांगितले. पाच एकदिवसीय सामन्यात मालिकेत सध्या भारताकडे 3-0 अशी आघाडी आहे.  

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथने केले भारतीय गोलंदाजांचे कौतुक स्टीव्ह स्मिथने जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमारवर स्तुतीसुमने उधळली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला. त्यानंतर या सामन्याबद्दल बोलताना स्मिथनं बुमराह व भुवनेश्वर हे सर्वोत्कृष्ट डेथ बोलर्स आहेत असं कौतुक केलं आहे.

भारताची गोलंदाजीही चांगली झाली. मला वाटतं, शेवटच्या महत्त्वाच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणारे बुमराह व भुवनेश्वर कुमार सध्याचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहेत. विशेषत: विकेट जर मंदावत असेल तर या दोघांना खेळणं अवघड असतं," असे उद्गार स्मिथने काढले आहेत.

टॅग्स :क्रिकेट