Deepak Chahar Girlfriend : आयोजकांनी VIP पाहुणी म्हणून ओळख करून दिली ती निघाली दीपक चहरची गर्लफ्रेंड, पाहा पूर्ण Video

लो केश राहुलनं नाबाद ९८ धावांची खेळी करताना चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. पण, त्याच्या या खेळीपेक्षा दीपक चहरच्या ( Deepak Chahar) प्रेमाच्या डावाचीच जास्त चर्चा रंगली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 08:05 PM2021-10-07T20:05:43+5:302021-10-07T20:18:11+5:30

whatsapp join usJoin us
Watch Video : Deepak Chahar has just proposed to his girlfriend in the stands! And it looks like she said yes, Know Who Is The Fiancee | Deepak Chahar Girlfriend : आयोजकांनी VIP पाहुणी म्हणून ओळख करून दिली ती निघाली दीपक चहरची गर्लफ्रेंड, पाहा पूर्ण Video

Deepak Chahar Girlfriend : आयोजकांनी VIP पाहुणी म्हणून ओळख करून दिली ती निघाली दीपक चहरची गर्लफ्रेंड, पाहा पूर्ण Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई सुपर किंग्स ( CSK) आणि पंजाब किंग्स ( PBSK) यांच्यातल्या सामन्यात पंजाबनं ६ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. लोकेश राहुलनं नाबाद ९८ धावांची खेळी करताना चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. पण, त्याच्या या खेळीपेक्षा दीपक चहरच्या ( Deepak Chahar) प्रेमाच्या डावाचीच जास्त चर्चा रंगली. सामन्यानंतर चेन्नईच्या गोलदाजानं स्टँडमध्ये  गुडघ्यावर बसून एका मुलीला प्रपोज केलं. याच मुलीला आयपीएल आयोजकांनी VIP गेस्ट असल्याचे त्यांच्या वेबसाईटवर सांगितले होते आणि सामन्यानंतर ती चहरची गर्लफ्रेंड असल्याचे स्पष्ट झाले. 

सामना संपल्यानंतर दीपक स्टँडमध्ये उभ्या असलेल्या त्या मुलीजवळ गेला. महेंद्रसिंग धोनीची मुलगी जिवाही तेथे उपस्थित होती. त्या मुलीला काही समजायच्या आधी दीपक तिच्यासमोर जाऊन गुडघ्यावर बसला. त्यानंतर खिशातून अंगठी काढून तिला लग्नाची मागणी घातली. हे सर्व पाहून ती मुलगी आनंदी झाली आणि लगेच होकार दिला. दीपकनं मग दुसरी अंगठी काढून तिला त्याच्या बोटात घालायला सांगितली. पण, ही मुलगी कोण आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दीपकचे नाव 'बिग बॉस' फेम सिद्धार्थ भारद्वाज (Sidharth Bharadwaj) याची बहीण जया भारद्वाज हिच्याशी जोडले गेले होते आणि ही तिच मुलगी आहे असा दावा केला जात आहे. 


 

Web Title: Watch Video : Deepak Chahar has just proposed to his girlfriend in the stands! And it looks like she said yes, Know Who Is The Fiancee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.