Join us  

KBCमध्ये अनिल कुंबळेशी संबंधित १२ लाख ५० हजार रुपयांचा प्रश्न; पण स्पर्धकाचं उत्तर चुकलं

महानायक अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 5:41 PM

Open in App

दिग्गज अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. हा शो भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. शोचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे देखील 'कौन बनेगा करोडपती'ने प्रेक्षकांच्या मनात जागा केली. सामान्य लोकांना प्रसिद्धी आणि असामान्य जागी घेऊन जाणारं हे व्यासपीठ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अलीकडेच एका एपिसोडदरम्यान शोमध्ये क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याचं उत्तर दिल्यास १२ लाख ५० हजार रूपये मिळणार होते. खरं तर अनिल कुंबळेंशी संबंधित विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात स्पर्धकाला अपयश आलं. 

'कौन बनेगा करोडपती'च्या एका शोमध्ये स्पर्धकाला विचारण्यात आले की, फेब्रुवारी १९९९ मध्ये दिल्लीत पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या एका डावात अनिल कुंबळेने १० बळी घेतले, तेव्हा सर्व फलंदाजांना बाद घोषित करणारे पंच कोण होते? हा प्रश्न तब्बल १२ लाख ५० हजार रूपयांना विचारण्यात आला होता. 

दरम्यान, या प्रश्नासाठी चार पर्याय देण्यात आले होते. KBC मध्ये स्पर्धकाला विचारलेल्या या प्रश्नाला चार पर्याय होते, ज्यामध्ये पिलू रिपोर्टर, एस वेंकटराघवन, डेव्हिड शेफर्ड आणि एव्ही जयप्रकाश यांची नावे होती. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए.व्ही.जयप्रकाश हे आहे. 

कुंबळेचा ऐतिहासिक 'सामना'त्या सामन्यात जयप्रकाश यांनीच पाकिस्तानी संघातील सर्व खेळाडूंना बाद घोषित केले होते. या सामन्याच्या दोन्ही डावात कुंबळेने एकूण १४ बळी पटकावले होते. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानवर २१२ धावांनी विजय मिळवला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत संपली.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनअनिल कुंबळेभारत विरुद्ध पाकिस्तान