Join us

वॉर्नरची कारकीर्द अजून शिल्लक आहे : जेम्स सदरलँड

‘चेंडू छेडछाड प्रकरणी एक वर्षाच्या बंदीला सामोरे गेलेला आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरची क्रिकेट कारकिर्द अजूनही शिल्लक आहे,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:42 IST

Open in App

सिडनी : ‘चेंडू छेडछाड प्रकरणी एक वर्षाच्या बंदीला सामोरे गेलेला आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरची क्रिकेट कारकिर्द अजूनही शिल्लक आहे,’ असे क्रिकेट आॅस्टेÑलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेम्स सदरलँड यांनी म्हटले.दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चेंडू छेडछाड प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्ध झाल्यानंतर वॉर्नरवर एका वर्षाची बंदी लावण्यात आली. तसेच या प्रकरणात सहभाग असलेला कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि वेगवान गोलंदाज कॅमरुन बेनक्रॉफ्ट यांच्यावरही अनुक्रमे एक वर्ष आणि ९ महिन्यांची बंदी लावण्यात आली.सदरलँड यांनी पुढे म्हटले की, ‘माझ्या मते प्रत्येकाकडे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी एक संधी असते. आता आपल्या कारकिर्दीला पुन्हा सावरण्याची जबाबदारी त्यांची स्वत:ची आहे. वॉर्नरला आपल्यात अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक असल्याचे सिद्ध करावे लागेल आणि त्यानंतरच त्याला संधी मिळेल.’ त्याचप्रमाणे, ‘तिन्ही खेळाडूंप्रती मला सहानुभूती आहे.