वॉर्नमुळे सर्वोत्कृष्ट कामगिरीची प्रेरणा मिळाली : कुलदीप

प्रतिस्पर्धी डग आऊटमध्ये महान लेगस्पिनर शेन वॉर्न यांच्या उपस्थितीपासून प्रेरणा घेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार केल्याचे मत कोलकाता नाईट रायडर्सचा युवा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने व्यक्त केले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 14:51 IST2018-05-17T04:48:21+5:302018-05-17T14:51:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Warne was inspired by best performance: Kuldeep | वॉर्नमुळे सर्वोत्कृष्ट कामगिरीची प्रेरणा मिळाली : कुलदीप

वॉर्नमुळे सर्वोत्कृष्ट कामगिरीची प्रेरणा मिळाली : कुलदीप

कोलकाता : प्रतिस्पर्धी डग आऊटमध्ये महान लेगस्पिनर शेन वॉर्न यांच्या उपस्थितीपासून प्रेरणा घेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार केल्याचे मत कोलकाता नाईट रायडर्सचा युवा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने व्यक्त केले आहे. कुलदीपने या सामन्याआधी १२ सामन्यात केवळ नऊ गडी बाद केले होते. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने २० धावांत चार गडी बाद करताच त्याची बळींची संख्या १३ झाली. केकेआरने हा सामना सहा गडी राखून सहज जिंकला.
रॉयल्सचे मेंटर असलेले शेन वॉर्न यांच्या साक्षीने गोलंदाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची माझी इच्छा होती, असे सांगून कुलदीप म्हणाला,
‘वॉर्न माझा आदर्श आहे, मी नेहमी त्यांचा चाहता राहिलो. त्यांच्यापुढे खेळताना वेगळीच प्रेरणा मिळते. ’ वॉर्न यांनी आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी मला टीप्स दिल्याचे कुलदीपने सांगितले. मी सामन्यानंतर त्यांचे मार्गदर्शन घेतले. ’ (वृत्तसंस्था)

Web Title: Warne was inspired by best performance: Kuldeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.