Join us

केक कापल्यामुळे वकार युनूसवर माफी मागण्याची वेळ

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात हेडिंग्ले येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर वसीम अक्रम यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 11:08 IST

Open in App

नवी दिल्ली: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक वकार युनूसवर रमजानच्या महिन्यात केक कापल्यामुळे माफी मागण्याची वेळ ओढावली. पाकिस्तानचे क्रिकेटपटू वसीम अक्रम यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत केक कापण्यात आला होता. यानंत वकारने ट्विट करून चाहत्यांची माफी मागितली. वसीम भाईंच्या वाढदिवसाला केक कापल्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. आम्हाला सध्या सुरू असलेल्या रमजानचा आणि रोजे धरणाऱ्यांचा आदर ठेवायला पाहिजे होता. आम्ही या कृतीबद्दल क्षमस्व आहोत, असे वकारने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात हेडिंग्ले येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर वसीम अक्रम यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यात आले होते. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी वसीम अक्रम व वकार युनूस यांच्यावर टीका केली होती. 

 

 

टॅग्स :रमजान ईदरमजानवसीम अक्रमक्रिकेट