Join us  

काव्या मारनला दाखवला ठेंगा! SRH च्या स्टार खेळाडूचा U Turn, देशासाठी खेळण्यास प्राधान्य

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली यंदा इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये उतरणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे लक्ष्य हे जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यावर असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 1:05 PM

Open in App

IPL 2024 Big Blow For SRH ( Marathi News ) :  पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली यंदा इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये उतरणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे लक्ष्य हे जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यावर असेल. पॅट कमिन्ससाठी त्यांनी सर्वाधिक रक्कम मोजली आणि ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी कर्णधाराकडे लीगमध्ये नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. पण, आयपीएल २०२४च्या मोहिमेला सुरुवात होण्याआधीच त्यांना धक्का बसला आहे.

संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasara   nga ) याने कसोटी निवृत्तीच्या निर्णयावरून यू टर्न घेतला आहे आणि आता तो बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. त्यामुळे त्याला आयपीएल २०२४ मधील सुरूवातीचे ३ सामने मुकावे लागणार आहेत.

श्रीलंकेने काल १७ सदस्यीय संघ जाहीर केला आणि त्यात वनिंदूचे नाव आहे. वनिंदूने ऑगस्ट २०२३ मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.  २२ मार्चपासून Sri Lanka vs Bangladesh कसोटी मालिका सुरु होत आहे आणि त्याचवेळी आयपीएलचा पहिला सामना खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबादचा आयपीएल २०२४ मधील पहिला सामना २३ मार्चला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध होणार आहे. श्रीलंका- बांगलादेश दुसरी कसोटी ३० मार्चपासून सुरु होतेय. याचा अर्थ वनिंदू SRHच्या २७ व ३१ मार्चला अनुक्रमे मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांच्याविरुद्धच्या लढतीतही खेळणार नाही. 

आयपीएल २०२४च्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर केले गेले आणि आता लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर लवकरच पूर्ण वेळापत्रक जाहीर होण्याचा अंदाज आहे. ५ एप्रिलला सनरायझर्सचा मुकाबला गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आहे आणि या सामन्यात वनिंदू खेळण्याचा अंदाज आहे. ऑक्शनमध्ये सनरायझर्सने १.५ कोटींच्या मुळ किमतीत वनिंदूला आपल्या ताफ्यात घेतले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला रिलीज केले होते. त्याने २०२२च्या पर्वात १६ सामन्यांत २६ विकेट्स घेतल्या होत्या.  

SRH’s full IPL squadअब्दुल समद, अभिषेक शर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), एडन मार्कराम, मार्को यानसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयांक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयांक मार्कंडे, उपेंद्र सिंग यादव, उम्रान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वनिंदू हसरंगा, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन. 

टॅग्स :आयपीएल २०२४काव्या मारनसनरायझर्स हैदराबाद