Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेहवागने त्याच्या 'अदृष्य बॅटिंग पार्टनर'ला दिल्या शुभेच्छा

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने त्याच्या 'अदृष्य बॅटिंग पार्टनर'ला शुभेच्छा दिल्या

By sagar.sirsat | Updated: August 5, 2017 06:31 IST

Open in App

मुंबई, दि. 5 - हटके ट्विटसाठी भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग ओळखला जातो. सेहवागने पुन्हा एकदा असंच ट्विट करून त्याच्या 'अदृष्य बॅटिंग पार्टनर'ला शुभेच्छा दिल्या आहेत. काल प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त सेहवागने स्वतःच्या खास शैलीत ट्विट केलं.  किशोर कुमार हे नेहमीच अदृष्य बॅटिंग पार्टनर राहिले असं सेहवागने म्हटलं.

संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख असलेल्या सदाबहार किशोर कुमार यांची काल 88वी बर्थ अॅनिव्हर्सरी होती.  यानिमित्त विविध क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागनेही किशोर कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची आठवण जागवली. 'हॅप्पी बर्थडे किशोर दा' अशा शुभेच्छा देणारा फोटो त्याने ट्विटरद्वारे शेअर केला. त्यासोबत '' माझ्या अदृष्य बॅटिंग पार्टनरची आज त्यांच्या जन्मदिनी मी आठवण जागवतोय...चला जाता हूं, किसी की धुन में, धड़कते दिल के..तराने लिए'' असं ट्विट त्याने केलं. सेहवागने केलेलं हे हटके ट्विट त्याच्या चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे.  

सेहवाग किशोर कुमार यांचा मोठा फॅन आहे. फलंदाजी करताना अनेकदा तो किशोर कुमारांची गाणी गुणगुणायचा असा खुलासा त्याने यापुर्वीच केला आहे. गोलंदाज धावत येत असताना किशोर कुमारांची गाणी गुणगुणायचो असं त्याने सांगितलं होतं.