वीरू तुस्सी ग्रेट हो!; दिल्लीतील कोरोना रुग्ण व गरजूंना मोफत अन्न, वीरेंद्र सेहवाग फाऊंडेशनचं मोठं कार्य!

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे... दररोज साडेतीन लाख नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे... आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा मोठा ताण पडत आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 07:45 AM2021-04-29T07:45:00+5:302021-04-29T07:45:01+5:30

whatsapp join usJoin us
Virender Sehwag Foundation is helping feed Covid patients & other needy with free nutritious home cooked food in Delhi | वीरू तुस्सी ग्रेट हो!; दिल्लीतील कोरोना रुग्ण व गरजूंना मोफत अन्न, वीरेंद्र सेहवाग फाऊंडेशनचं मोठं कार्य!

वीरू तुस्सी ग्रेट हो!; दिल्लीतील कोरोना रुग्ण व गरजूंना मोफत अन्न, वीरेंद्र सेहवाग फाऊंडेशनचं मोठं कार्य!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे... दररोज साडेतीन लाख नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे... आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा मोठा ताण पडत आहे... ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे.. अशात पुन्हा एकदा अनेक लोकं मदतीसाठी पुढे येत आहेत. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सन यानं पंतप्रधान फंडात ३० लाखांची मदत केली. ऑसींचा माजी गोलंदाज ब्रेट ली यानंही ४३ लाख भारतातील विविध हॉस्पिटल्संना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दान केले. भारतीय खेळाडू शेल्डन जॅक्सन यानंही गौतम गंभीर फाऊंडेशनला मदत जाहीर करून इतरांनाही पुढाकार घेण्यास सांगितले. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) हा त्याच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू व कोरोनाग्रस्त लोकांना मोफत घरचं जेवण पुरवण्याचं काम करत आहे. कडक सॅल्युट!; इरफान व युसूफ पठाण कोरोना रुग्णांना पुरवतायत मोफत अन्न; ट्विट केला हेल्पलाईन नंबर

पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे ४० सीआरपीएफ ( Central Reserve Police Force) जवान शहीद झाले.   वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. ही मुलं   हरयाणा येथील झज्जर मधील सेहवागच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळातही सेहवागच्या फाऊंडेशननं गरीब मजूरांना मोफत अन्न पुरवण्याचं काम केलं होतं. 


आता पुन्हा सेहवाग फाऊंडेशन मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील गरजू व कोरोना रुग्णांना ते घरचं मोफत जेवण देत आहेत. शिवाय त्यांचा ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करण्याचा विचार आहे. त्यासाठी त्यांनी मदतीचं आवाहन केलं आहे.


 

Web Title: Virender Sehwag Foundation is helping feed Covid patients & other needy with free nutritious home cooked food in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.