Join us  

विराटचा संघ विजयासाठी भुकेला, विदेशात चांगली कामगिरी करुन दाखवायचे हेच वर्ष - रवी शास्त्री

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौ-यातील पहिल्या कसोटी सामन्याला महिन्याभरापेक्षा कमी वेळ उरलाय. भारताची आतापर्यंतची परदेशातील कामगिरी लक्षात घेता दक्षिण आफ्रिका दौरा भारतासाठी आव्हानात्मक असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2017 6:19 PM

Open in App
ठळक मुद्देसध्याचा भारतीय संघ चांगला वाटत असून त्यांना आपला प्राधान्यक्रम ठाऊक आहे. मागच्या दोन वर्षात श्रीलंकेचा जुलै-ऑगस्टमधला दौरा सोडला तर आपण स्वदेशातच जास्त मालिका खेळलो आणि आपण उत्तम कामगिरी केली.

मुंबई - टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौ-यातील पहिल्या कसोटी सामन्याला महिन्याभरापेक्षा कमी वेळ उरलाय. भारताची आतापर्यंतची परदेशातील कामगिरी लक्षात घेता दक्षिण आफ्रिका दौरा भारतासाठी आव्हानात्मक असेल. या पार्श्वभूमीवर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची कामगिरी कशी होते यावर सर्वांचेच लक्ष असेल. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत भारतीय संघाची तयारी आणि परदेशातील आव्हाने याबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन सांगितला. 

सध्याचा भारतीय संघ चांगला वाटत असून त्यांना आपला प्राधान्यक्रम ठाऊक आहे. देशात किंवा परदेशात स्वत:ला सिद्ध करुन दाखवायची भूक या संघामध्ये आहे. मागच्या दोन वर्षात श्रीलंकेचा जुलै-ऑगस्टमधला दौरा सोडला तर आपण स्वदेशातच जास्त मालिका खेळलो आणि आपण उत्तम कामगिरी केली. या मुलांना 2018 या वर्षाचे महत्व कळते असे शास्त्री म्हणाले. 

देशात खेळणे असो किंवा विदेशात त्याने फरक पडत नाही. समजा आम्ही कोलकात्यात एक कसोटी सामना खेळलो आणि दोन वर्षांनी पुन्हा तिथे खेळण्यासाठी जातो तसेच परदेश दौ-याचेही आहे. सध्याच्या जमान्यात तुम्ही कुठेही जा, मैदानावर उतरुन तुम्हाला परफॉर्मन्स द्यायचा असतो. भारतीय संघ परदेशात खराब कामगिरी करतो असे म्हटले जाते पण आमच्याबद्दल ही जी धारण बनली आहे तीच आम्हाला  बदलायची आहे आणि हेच ते वर्ष आहे असे शास्त्री म्हणाले. परदेशात खासकरुन दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौ-यात भारतीय संघाला अद्याप मालिका विजय मिळवता आलेला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ताज्या दमाचा भारतीय संघ विजयासाठी भुकेला असून, अपयशाचे कटू सत्य बदलण्यासाठी सज्ज आहे. 

टॅग्स :रवी शास्त्रीक्रिकेट