Join us  

विराटच म्हणतो... भारताचा हा संघ विश्वचषक स्पर्धेसाठी तयार नाही !

भारताचा हा संघ विश्वचषक स्पर्धेसाठी अद्याप तयार नाही... अजिबात नाही, असे मत कर्णधार विराट कोहलीनेच व्यक्त करून संघातील प्रत्येख खेळाडूची अप्रत्यक्ष कान उघडणी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 10:21 AM

Open in App

लंडन - भारताचा हा संघ विश्वचषक स्पर्धेसाठी अद्याप तयार नाही... अजिबात नाही, असे मत कर्णधार विराट कोहलीनेच व्यक्त करून संघातील प्रत्येख खेळाडूची अप्रत्यक्ष कान उघडणी केली आहे. इंग्लंडविरूद्धच्या वन डे मालिकेत भारताला 2-1 असा पराभव पत्करावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेतील संघाच्या कामगिरीचा आढावा घेतल्यात 2019 मध्ये होणा-या विश्वचषक स्पर्धेसाठी संघात सुधारणेची गरज असल्याचे विराटने सांगितले. तिस-या वन डे सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात कोहली म्हणाला, प्रत्येक संघ आतापासूनच 2019च्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. समतोल संघ ही प्रत्येकाचे प्रमुख लक्ष्य आहे. अशा मालिकांमधून आणि अशा पराभवांमधून संघातील त्रुटी समोर येतात. विश्वचषक स्पर्धेला सामोरो जाण्यापूर्वी त्या चूका सुधारण्याची संघी आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला तयारीसाठी बरेच सामने खेळण्याची संधी मिळणार आहे, असे मत भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केले होते. त्यावर कोहली म्हणाला, आम्हाला 15 ते 16 सामने खेळण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी पुरेशी संधी मिळत आहे. त्यामुळे समतोल संघबांधणी करावी लागेल. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघांड्यांचा समतोल राखून पुढे वाटचाल करणे गरजेचे आहे. इंग्लंडविरूद्धच्या तिसर-या वन डे कोहलीने अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्मा पुन्हा एकदा झटपट बाद झाला आणि शिखर धवन दुर्दैवीरीत्या धावचीत होऊन माघारी परतला. दिनेश कार्तिकने धडाक्याने सुरूवात केली, परंतु त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. सुरेश रैना आणि हार्दिक पांड्या पुन्हा अपयशी ठरले. महेंद्रसिंग धोनीने उपयुक्त खेळ करत संघाला 258 धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. मात्र गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर जो रुट (१००*) आणि कर्णधार इयॉन मॉर्गन (८८*) यांच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने निर्णायक तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा 8 विकेट्स राखून पराभव केला.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीक्रिकेटक्रीडा