सौरव गांगुली लिहितात...
खडतर सुरुवातीनंतर दक्षिण आफ्रिका दौºयावरून भारतीय संघ उंचावलेल्या मनोधैर्यासह परतला आहे. केपटाऊनमध्ये अखेरचा सामना जिंकणे प्रशंसनीय आहे. कारण येथेच भारताने पहिला कसोटी सामना (आणि मालिका) गमावला होता. त्यानंतर भारताने दमदार पुनरागमन करीत एकदिवसीय व टी-२० सामन्यांची मालिका जिंकली. विराट कोहलीविना खेळताना भारताने अखेरचा सामना जिंकला, हे विशेष.
टी-२० मालिकेची वाटचाल बघता १७२ तशी मोठी धावसंख्या नव्हती, पण भारताने त्याचा योग्य बचाव केला. अंतिम सामन्याच्या निकालात उभय संघांदरम्यान केवळ ७ धावांचा फरक दिसत असला तरी दक्षिण आफ्रिका संघाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. दरम्यान जोनकेरने उल्लेखनीय खेळ केला, पण अखेर त्याचे प्रयत्न अपुरेच पडले. दक्षिण आफ्रिकेच्या संघव्यवस्थापनाने मिलर व ड्युमिनी यांना नक्कीच पहिल्या सहा षटकांमध्ये तुम्ही काय केले, अशी विचारणा केली असेल. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सहा षटकांमध्ये केवळ २४ धावा केल्या.
या संपूर्ण दौºयात भारतातर्फे विराट कोहलीची कामगिरी उल्लेखनीय ठरली. केवळ त्याची फलंदाजीच नाहीतर त्याचे नेतृत्वही चांगले झाले, विशेषता वाँडरर्समध्ये. अशा कामगिरीमुळे संघात सर्वोत्तम व मजबूत असल्याचा विश्वास निर्माण होतो. त्याने त्या खेळपट्टीवर केवळ ४० धावा केल्या असल्या तरी त्याची त्या कसोटी सामन्यातील देहबोली या दौºयावर संघाचे मनोधैर्य उंचावण्यास कारणिभूत ठरली. त्याने फलंदाजीची नवी उंची गाठली आहे. आगामी इंग्लंड व आॅस्ट्रेलिया दौºयासाठी ही चांगली बाब आहे. या दोन देशांमध्ये हा संघ कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला तर दौरा करणाºया संघासाठी ती उल्लेखनीय बाब ठरेल.
भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी चमकदार कामगिरी करीत भारतीय वेगवान गोलंदाजीचे भविष्य असल्याचे सिद्ध केले. माझ्या मते भुवीने कामगिरीचा दर्जा उंचावला असून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो भरवशाचा गोलंदाज आहे. त्याचा ठाम निर्धार, सहजता वाखागण्याजोगी आहे. त्यामुळेच तो मैदानवर सर्वोत्तम ठरतो.
एकदिवसीयमध्ये युझवेंद्र चहल व कु लदीप यादव यांनी वर्चस्व गाजवल्याचे वेगळे सांगण्याची गरज नाही. कुलदीपला टी-२० मध्ये संधी मिळाली नाही आणि त्याचवेळी निवडकर्ते एकदिवसीय मालिकेच्या उत्तरार्धात आणि टी-२० मालिकेत विशेष अनुभव नसलेल्या चहलची ढासळलेली कामगिरी अधिक विचारात घेणार नाहीत, अशी आशा आहे. त्यांनी संयम बाळगत त्याच्या गोलंदाजीवर अधिक मेहनत घ्यायला हवी. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्येही त्याचा वापर करता येईल. त्यामुळेच या दोन्ही युवा फिरकीपटूंना इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळेल, याबाबत शंका नाही. (गेमप्लॅन)