Join us  

कोहलीची 'विराट' कमाई,  स्टार फुटबॉलपटू मेसीला टाकले मागे

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खोऱ्यानं धावा काढणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने वार्षिक कमाईच्याबाबतीत जगभरातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या लिओनेल मेसीला मागे टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 3:03 PM

Open in App

नवी दिल्ली - क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खोऱ्यानं धावा काढणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जगातील सर्वात 'मार्केटेबल' खेळाडूंच्या यादीत अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीला मागे टाकले आहे.  'फोर्ब्‍स' या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीत विराटने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातवे स्थान पटकावले आहे. फोर्ब्सने खेळाडूंना मिळणारे वेतन, बोनस आणि जाहिरातीच्या आधारावर मिळणाऱ्या रकमेच्या आधारावर ही यादी तयार केली आहे. वार्षिक कमाईच्याबाबतीत विराटने जगभरातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या लिओनेल मेसीला मागे टाकले आहे. या यादीत मेसीला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. 

फोर्ब्स या मासिकानं सर्वाधिक वार्षिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी आज जाहीर केली. यामध्ये 37.2 मिलियन डॉलरच्या कमाईसह टेनिस स्टार रॉजर फेडररनं अव्वल स्थान काबीज केलं आहे.  त्याच्यानंतर बास्केट बॉलपटू लेब्रॉन जेम्स दुसऱ्या क्रमांकावर असून वेगवान धावपटू उसेन बोल्ट 27 मिलियन डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर विराट कोहली 14.5 मिलियन डॉलरसह सातव्या क्रमांकावर आहे. तर मेसीची 13.5  मिलियन डॉलरच्या कमाईसह नवव्या स्थानावर वर्णी लागली आहे. जगभरातील लोकप्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहामध्ये असणारा विराट एकमेव क्रिकेटर आहे.

फोर्ब्‍सने जाहीर केलेली सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी - 1. रॉजर फेडरर (37.2 मिलियन डॉलर)2. लेब्रॉन जेम्‍स (33.4  मिलियन डॉलर)3. उसेन बोल्‍ट ( 27 मिलियन डॉलर)4. क्रिस्टियानो रोनाल्‍डो  ( 21.5मिलियन डॉलर)5. फिल मिकेलसन (19.6 मिलियन डॉलर)6. टाइगर वुड्स (16 मिलियन डॉलर)7. विराट कोहली (14.5 मिलियन डॉलर)8. रॉकी मॅकलेरॉय (13.6 मिलियन डॉलर)9. लियोनेल मेसी (13.5 मिलियन डॉलर)10. स्‍टीफन करी (13.4 मिलियन डॉलर)

टॅग्स :क्रिकेटविराट कोहलीलिओनेल मेस्सी