Join us

माझं संपूर्ण जग एका फ्रेममध्ये!; लेकीच्या फोटोवरील विराट कोहलीच्या कमेंटनं  जिंकली मनं

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हीनं कन्येचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात तिच्यासोबत विराट कोहली ( Virat Kohli) हाही दिसत आहे. अ

By स्वदेश घाणेकर | Updated: February 1, 2021 14:41 IST

Open in App

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हीनं कन्येचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात तिच्यासोबत विराट कोहली ( Virat Kohli) हाही दिसत आहे. अनुष्कानं पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विराट-अनुष्का या दोघांचेही चाहते, मित्रपरिवार आणि सहकारी या सर्वांनी फोटोवर शुभेच्छा दिल्या. पण, अनुष्काच्या या फोटोवर विराटनं लिहिलेली पोस्ट सर्वांचे मन जिंकणारी ठरली. मागे पडलेल्यांनी जिंकून दाखवलं; टीम इंडियाच्या पराक्रमाचं उदाहरण वित्तमंत्री देतात तेव्हा...  

विराटनं कमेंट केली की,''माझं संपूर्ण जग एका फ्रेममध्ये!'' या पोस्टला आतापर्यंत ३१ मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर विराटच्या कमेंटला ६० हजारहून अधिक लाईक्स आहेत.  Vamika Meaning: ... म्हणून विराट-अनुष्का यांनी कन्येचं नाव 'वामिका' असं ठेवलं! 

हार्दिक पांड्यानंही या दोघांच्या फोटोवर कमेंट केली आहे.  लेकीचा सोशल मीडियावरील पहिलाच फोटो शानदार बनवण्यासाठी अनुष्कानं विषेश कॅप्शनही लिहिली. तिनं लिहिले की,''आम्ही एकत्र प्रेम व कृतज्ञतेसह राहत होतो, परंतु या छोट्याशा वामिकानं आमच्या आनंदात आणखी भर टाकली. रडणं, हसणं, चिंता, आनंद या सर्व भावना आम्ही एका क्षणात अनुभवल्या. तुम्ही दाखवलेलं प्रेम व प्रार्थना यासाठी आभारी आहे.'' IPL Auction 2021 : मोहम्मद अझरुद्दीनसह १० अनकॅप खेळाडूंसाठी फ्रँचायझी पाडणार पैशांचा पाऊस! 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा