सचिन कोरडे
गोवा : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीयांनी विक्रमांची बरसात केली. त्यात कर्णधार म्हणून विराट कोहलीनेही महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केला. धोनीकडून धुरा स्वीकारल्यानंतर विराटकडे नवख्या क्रिकेटपटूप्रमाणे पाहिले जात होते. आज त्याच युवा खेळाडूच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजयाचा रतीब नोंदवला. भारताला विराटने ३९ सामन्यांत ३० विजय मिळवून दिले. यात केवळ ७ पराभवांचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे, विराटच्या विजयाची सरासरी ही सर्वाधिक म्हणजे ती ८०.५५ टक्के आहे. अशी सरासरी भारताच्या कोणत्याही कर्णधाराची नाही. पहिल्या ३८ सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवून देण्याच्या यादीतही विराटने वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू क्लाईव्ह लॉॅयड आणि व्हिव रिचडर््स यांची बरोबरी केली. आॅस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकीपॉँटिंग ३१ विजयांसह आघाडीवर असून विराट लवकरच त्यालाही मागे टाकेल. यासह आपल्याकडे नेतृत्वगुण असल्याचेही त्याने सिद्ध केले.
आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसºया एकदिवसीय सामन्यातील विजयानंतर विराटने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या सलग ९ विजयांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने नोव्हेंबर २००८ ते फेब्रुवारी २००९ मध्ये सलग ९ एकदिवसीय सामने जिंकले होते. भारतीय संघाची ती सर्वाेत्कृष्ट कामगिरी होती. त्याची पुनरावृत्ती विराटने केली.
भारताला विराटने ३० वन-डे जिंकून दिले तेही ८०.५५ टक्के या सरासरीने. २००७-२०१६ दरम्यान धोनीने १९९ सामन्यांपैकी ५९.५७ च्या सरासरीने ११० सामने जिंकले. मोहम्मद अझरुद्दिनने १९९०-९९ दरम्यान १७४ सामन्यांत ९० विजय मिळवून दिले होते.