Join us  

पुनरागमनासाठी विराट कोहली लागला कामाला, पाहा व्हिडीओ

विश्रांतीनंतर विराट कोहली भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताला  आगामी मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करायचा आहे. मात्र संघात पुनरागमन करण्यासाठी विराटला यो यो टेस्टमध्ये पास व्हावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 9:37 AM

Open in App

नवी दिल्ली : विश्रांतीनंतर विराट कोहली भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताला  आगामी मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करायचा आहे. मात्र संघात पुनरागमन करण्यासाठी विराटला यो यो टेस्टमध्ये पास व्हावे लागणार आहे. त्याशिवाय त्याला संघात प्रवेश मिळवणे कठीण आहे. याची कल्पना असल्याने विराटही मोठ्या तयारीने कामाला लागला आहे. 

इंग्लंड दौऱ्यात भारताचा चांगली कामगिरी करता आली नव्हती. वन डे पाठोपाठ कसोटी मालिकेतही इंग्लंडने भारताला धूळ चारली होती. या दौऱ्यानंतर कोहलीने विश्रांती घेण्याचे ठरवले आणि आशिया चषक स्पर्धेत रोहित शर्माला कर्णधारपद म्हणून घोषित केले. आशिया चषक स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे.  पण या मालिकेत खेळण्यासाठी विराटला आपण तंदुरुस्त असल्याचे सिद्ध करावे लागेल. 28 सप्टेंबरला त्याची यो-यो टेस्ट होणार आहे. त्यासाठी आपण कसून मेहनत घेत असल्याचे विराटने सांगितले. 

पाहा हा व्हिडिओ..  

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय