Join us  

... तर विराट कोहलीनं टीम इंडियाचं कर्णधारपद सोडावं; इंग्लंडच्या माजी खेळाडूची मागणी

दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढत असतानाही अजिंक्यनं संयमी नेतृत्व कौशल्य दाखवलताना युवा खेळाडूंसह बलाढ्य कांगारूंना पराभवाची चव चाखवली.

By स्वदेश घाणेकर | Published: January 23, 2021 12:16 PM

Open in App

विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला. दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढत असतानाही अजिंक्यनं संयमी नेतृत्व कौशल्य दाखवलताना युवा खेळाडूंसह बलाढ्य कांगारूंना पराभवाची चव चाखवली. शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शुबमन गिल हे भविष्याचे स्टार या मलिकेतून टीम इंडियाला मिळाले. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आतापर्यंत एकही कसोटी सामना हरलेला नाही आणि त्यामुळे आता कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्यकडे सोपवण्याची मागणी धरत आहे. त्यात आता इंग्लंडचा माजी गोलंदाज माँटी पानेसार ( Monty Panesar) यानं विराट कोहलीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची मागणीचा मुद्दा छेडला आहे. ( Virat Kohli will have to step down as captain if....) 

३२ वर्षीय विराट टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यानं कर्णधारपदावरून पायउतार व्हावे, असे पानेसार म्हणाला. टीम इंडियाला विराटनं अनेक द्विदेशीय मालिका जिंकून दिल्या आहेत, परंतु त्याला वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. भारताला २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून हार मानवी लागली होती. ''ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. तरीही टीम इंडिया जिंकू शकत नसतील, तर विराट कोहलीनं कर्णधारपद सोडावं. या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांपैकी किमान एकतरी त्यानं नेतृत्वाखाली जिंकावी,''असे पानेसार म्हणाला. ( Virat Kohli will have to step down as captain if....) 

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी कशी होते, याची पानेसारला उत्सुकता लागली आहे. विराटनं हुकूमशाही पद्धतीची स्टाईल सोडून सहकाऱ्यांचे ऐकण्यास सुरुवात केले पाहीजे, असे पानेसारला वाटते. ''अजिंक्य रहाणे व रोहित शर्मा यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली, तेव्हा तेव्हा या जोडीनं चांगली कामगिरी करून दाखवली. आता या स्टार खेळाडूंना हाताळण्याचे कौशल्या विराटला दाखवावे लागेल. त्याच्या कर्णधारपदाचा हा पुढचा टप्पा आहे,''असे तो म्हणाला.   

इंग्लंड मालिकेतील पहिल्या दोन कसोटींसाठीचा भारतीय संघ( Indian squad for the first two Test matches against England) 

रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर, 

नेट बॉलर : अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार 

राखीव खेळाडू : के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम, राहुल चाहर आणि अभिमन्यू ईश्वरन.   

 

भारतविरुद्ध इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक ( India vs England Full Time Table)  

कसोटी मालिका - पहिली ५ ते ९ फेब्रुवारी - चेन्नईदुसरी चेन्नई १३ ते १७ फेब्रुवारी- चेन्नईतिसरी २४ ते २८ फेब्रुवारी- अहमदाबादचौथी ४ ते ८ मार्च -अहमदाबाद

ट्वेंटी- 20  मालिका  (सर्व सामने अहमदाबाद) १) १२ मार्च पहिला टी-२०२) १४ मार्च दुसरा टी-२०३) १६ मार्च तिसरा टी-२०४) १८ मार्च चौथा टी-२०५) २० मार्च पाचवा टी-२०

वन-डे मालिका (सर्व सामने पुणे येथे)१) २३ मार्च पहिला वन-डे२) २६ मार्च दुसरा वन-डे३) २८ मार्च तिसरा वन-डे

टॅग्स :विराट कोहलीइंग्लंडभारत विरुद्ध इंग्लंडअजिंक्य रहाणेरोहित शर्मा