Join us  

विराट कोहलीला लग्नाच्या anniversaryला अनुष्काकडून मिळणार Surprise

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या सेलिब्रिटी दाम्पत्याची नेहमी चर्चा असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 12:41 PM

Open in App
ठळक मुद्देविराट कोहली ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी उत्सुकअनुष्का शर्माही Zero चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यग्र आहे11 डिसेंबरला विरुष्काच्या लग्नाचा पहिला वाढदिवस

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या सेलिब्रिटी दाम्पत्याची नेहमी चर्चा असते. या दोघांच्या प्रत्येक हालचालींवर फॅन्सची बारीक नजर असते. त्यामुळेच लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला विरुष्का नक्की काय करणार आहेत, याची उत्सुकता लागली आहे. 11 डिसेंबर 2017 मध्ये कोहली आणि अनुष्का लग्नाच्या बंधनात अडकले. भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि त्याच काळात विरुष्काची पहिली anniversary आहे. त्यामुळे विरुष्का पहिला वाढदिवस कसा साजरा करतीय, याची चिंता फॅन्सला लागली आहे. त्यांच्यासाठी अनुष्काने आनंदाची बातमी आणली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पती विराटला लग्नाच्या anniversaryचे Surprise देण्यासाठी अनुष्काने विशेष प्लान केला आहे. 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 6 डिसेंबरपासून सुरु होता आहे. या मालिकेत विजय मिळवून इतिहास घडविण्यासाठी कोहली उत्सुक आहे, अनुष्काही तिचा आगामी चित्रपट Zeroच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मात्र, तिने हबी विराटला anniversaryचे सप्राईज देण्यासाठी रजा घेतली असून ती ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातही विरुष्काच्या प्रेमाचे वारे वाहताना दिसले, तर आश्चर्य वाटायला नको.  एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार अनुष्काने मागील महिन्यातच ऑस्ट्रेलियात जाण्याची तयारी केली आहे. Zero चित्रपटाच्या टीमलाही त्याची कल्पना आहे. लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ती ऑस्ट्रेलियात जाणार आहे. त्या एका दिवसासाठी तिने व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढला आहे.  विराट आणि अनुष्का यांनी हिंदू पद्धतीने इटलीत लग्न केले.   

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाझिरो सिनेमाविरूष्काविरूष्का वेडिंग