Join us

'तिच्या'पेक्षा उंच दिसण्यासाठी विराट कोहलीनं लढवली शक्कल, पण...

भारताय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली विक्रमांमुळे सतत चर्चेत राहतो. पण, सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ते त्याने केलेल्या एका कृतीची.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 21:19 IST

Open in App

मुंबई : भारताय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली विक्रमांमुळे सतत चर्चेत राहतो. पण, सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ते त्याने केलेल्या एका कृतीची. भारताची महिला अॅथलिटपेक्षा उंच दिसण्यासाठी त्याने केलेला प्रयत्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विराटने काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यात अन्य खेळातील उदयोन्मुख खेळाडूंचाही समावेश होता.विराटने या कार्यक्रमात टेनिसपटू करमन कौर थंडीसोबत फोटो काढताना तिच्या उंचीशी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नानंतर विराट सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. या  कार्यक्रमात विराटसह सतमन सिंह, करमन कौर थंडी, आदिल बेदी, शिवानी कटारिया, सचिका कुमार इंगळे,  पिंकी राणी आणि मनोज कुमार हे खेळाडू उपस्थित होते.

टॅग्स :विराट कोहली