Join us  

फक्त सात वर्षाच्या चाहत्याची कोहलीने घेतली ऑटोग्राफ; व्हिडीओ वायरल

विजयानंतर बऱ्याच जणांना कर्णधार विराट कोहलीची आटोग्राफ घेण्याता मोह आवरता आला नाही. पण कोहलीने यावेळी चक्क एका चाहत्याचीच ऑटोग्राफ घेतल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 7:50 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताने वेस्ट इंडिजवर कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. या विजयानंतर बऱ्याच जणांना कर्णधार विराट कोहलीची आटोग्राफ घेण्याता मोह आवरता आला नाही. पण कोहलीने यावेळी चक्क एका चाहत्याचीच ऑटोग्राफ घेतल्याचे पाहायला मिळाले.

सामना संपल्यावर कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे एका हॉटेलमध्ये दिसले. यावेळी बऱ्याच जणांनी कोहलीच्या ऑटोग्राफ घेतल्या. एक लहान सात वर्षांचा मुलगा कोहली जवळ आला आणि त्याने त्याला विचारले, तुम्हाला माझा ऑटोग्राफ हवा आहे का? त्यानंतर कोहलीने एका कागदावर त्या लहान मुलाची ऑटोग्राफ घेतल्याचे पाहायला मिळाले.

 भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सहजच विजय मिळवला. भारताने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ 210 धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे, 257 धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने कसोटी मालिका जिंकली.

हनुमा विहारीच्या कारकीर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर जसप्रीत बुमराहच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव 47.1 षटकात 117 धावांत गुंडाळला. त्यामुळे भारताने तब्बल 299 धावांची भलीमोठी आघाडी घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. त्यानंतर, फलंदाजीस आलेल्या टीम इंडियाने 168 धावांवर 4 गडी बाद असताना डाव घोषित केला. त्यामुळे वेस्ट इंडिजला 467 धावांचे लक्ष्य पार देण्यात आले होते.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा