Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली घेणार कौंटीची उड्डाणे; अफगाणविरुद्धच्या कसोटीतून बाहेर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सप्टेंबर महिन्यात इंग्लंड विरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी कौंटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे. तो कोणत्या कौंटी संघातून खेळेल हे अजून नक्की नाही. मात्र तो सर्रेकडून खेळण्याची शक्यता आहे. २०१४ च्या इंग्लंड दौºयातील अपयश धुऊन काढण्यासाठी कोहली तयारी करतोय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 05:21 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सप्टेंबर महिन्यात इंग्लंड विरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी कौंटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे. तो कोणत्या कौंटी संघातून खेळेल हे अजून नक्की नाही. मात्र तो सर्रेकडून खेळण्याची शक्यता आहे. २०१४ च्या इंग्लंड दौºयातील अपयश धुऊन काढण्यासाठी कोहली तयारी करतोय.सीओए प्रमुख विनोद राय यांनी सांगितले की,‘विराट इंग्लिश कौंटी संघ सर्रेकडून जूनमध्ये काउंटी क्रिकेट खेळेल. चेतेश्वर पुजारा यार्कशर, आर.अश्विन वार्विकशर आणि ईशांत शर्मा ससेक्सकडून खेळणार आहे. विराट अफगाणिस्तान विरोधात १४ ते १८ जून दरम्यान होणाºया कसोटी सामन्यात खेळणार नाही.’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘हा निर्णय खेळाडूंसोबत केलेल्या चर्चेतून घेण्यात आला. आमचे मत आहे की दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर आमचा कसोटी संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेसाठी अनुकूल हवा. बीसीसीआय विविध कौंटी संघाच्या संपर्कात आहे.’ कोहली आयपीएलच्या ११ व्या सत्रानंतर इंग्लंडला रवाना होईल. इंग्लंडमध्ये २०१४ च्या दौºयात कोहली अपयशी ठरला होता. तो एकही अर्धशतक झळकावू शकला नाही. स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसनच्या आॅफ स्टम्पच्या बाहेर जाणाºया चेंडूमुळे तो त्रस्त झाला होता.या दौºयातील अपयश धुवून काढण्यासाठी कोहली कौंटी संघाकडून खेळणार आहे.(वृत्तसंस्था)इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीबाबत मुख्य थिंक टँक कर्णधार कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री, भारत ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड, महाव्यवस्थापक (क्रिकेट संचालन) साबा करीम आणि निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यासोबत चर्चा झाली आहे. भारतीय खेळाडू जून महिन्यात दोन टप्प्यात इंग्लंड दौºयावर जातील.- विनोद राय

टॅग्स :विराट कोहली