सचिन, द्रविड, गांगुलीच्या पुढे कोहली; विदेशात सर्वाधिक धावा ठोकण्याचा मान

कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होताच विराट कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 08:17 AM2022-01-21T08:17:33+5:302022-01-21T08:23:22+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli surpasses Sachin Tendulkar to become Indias highest run getter in away ODIs | सचिन, द्रविड, गांगुलीच्या पुढे कोहली; विदेशात सर्वाधिक धावा ठोकण्याचा मान

सचिन, द्रविड, गांगुलीच्या पुढे कोहली; विदेशात सर्वाधिक धावा ठोकण्याचा मान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होताच विराट कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डेत त्याने ५१ धावा ठोकून विदेशात सर्वाधिक धावा ठोकण्याचा मान मिळविला. त्याने मास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. सचिनने भारताबाहेर प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध १४७ वन डेत १२ शतके आणि २४ अर्धशतकांसह  ५०६५ धावा केल्या आहेत. सचिनची विदेशात खेळताना सर्वोच्च धावसंख्या नाबाद १६३ होती. कोहलीने आतापर्यंंतच्या १०८ सामन्यात ५१०८ धावा केल्या आहेत. कोहलीने तेंडुलकरपेक्षा ३९ वनडे कमी खेळले आहेत.

भारताबाहेर वन डेत सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज
विराट कोहली- ५१०८
सचिन तेंडुलकर- ५०६५
महेंद्रसिंग धोनी- ४५२०
राहुल द्रविड- ३९९८
सौरव गांगुली- ३४६८

विदेशात सर्वाधिक धावा काढणारे जागतिक फलंदाज
कुमार संगकारा- ५५१८ धावा
रिकी पाँटिंग- ५०९० धावा

गांगुली, द्रविडला टाकले मागे
विराट एवढ्यावर थांबला नाही. त्याने काल २७ वी धाव घेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डेत भारताकडून सर्वाधिक धावा काढणारा दुसरा फलंदाज होण्याचा मान मिळविला. विराटने सौरव गांगुली यांच्या १३१३ आणि राहुल द्रविड यांच्या १३०९ या धावांना मागे टाकले. पहिल्या स्थानावर सचिन असून सचिनच्या नावावर २००१ धावांची नोंद आहे. 

विराटने लक्ष्याचा पाठलाग करताना एकूण ६० व्यांदा ५० हून अधिक धावा काढल्या.
वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीचे हे एकूण ६३ वे अर्धशतक होते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मागील सहा वन डे डावांमध्ये कोहलीचे हे पाचवे अर्धशतक ठरले. 
 

Web Title: Virat Kohli surpasses Sachin Tendulkar to become Indias highest run getter in away ODIs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.