Join us  

विराट कोहलीने मधल्या फळीचा प्रश्न सोडवला, म्हणाला 'या' खेळाडूवर विश्वास

भारतीय संघाला वन डे क्रिकेटमध्ये सलामीच्या फलंदाजाची समस्या भेडसावत नसली तरी मधल्या फळीतील फलंदाजांना अजूनही सूर गवसलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 4:27 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाला वन डे क्रिकेटमध्ये सलामीच्या फलंदाजाची समस्या भेडसावत नसली तरी मधल्या फळीतील फलंदाजांना अजूनही सूर गवसलेला नाही. विशेषतः भारतीय संघाला चौथ्या क्रमांकासाठी योग्य तो पर्याय सापडलेला नाही. मात्र, 2019 च्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी ही समस्या सोडवण्यात येईल आणि भारताला चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज सापडेल असा विश्वास कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला आहे. कोहलीने या स्थानासाठी अंबाती रायुडुचे नाव पुढे केले आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली वन डे लढत रविवारी गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला,''चौथ्या क्रमांकाची समस्या आम्हाला बऱ्याच काळापासून भेडसावत आहे. या स्थानासाठी आम्ही बरेच प्रयोग केले, परंतु खेळाडूंना त्याचं सोनं करता आलेले नाही. अंबातीने सातत्यपूर्ण खेळ केला, तर 2019च्या विश्वचषक स्पर्धेसाठी आम्ही हा प्रश्न सोडवू शकतो.'' 

तो पुढे म्हणाला,''रायुडुने आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्याला विश्वचषक स्पर्धेपर्यंत आणखी संधी मिळायला हवी, तरच चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सोडवता येईल.'' आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करताना रायुडुने 43 च्या सरासरीने 602 धावा केल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याला राष्ट्रीय वन डे संघात स्थान मिळाले. मात्र, यो-यो चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाता आले नाही. 

टॅग्स :विराट कोहलीअंबाझरी तलाव