Join us  

विराट कोहली अन् RCB पाहतायेत IPL 2020 जेतेपदाचे स्वप्न, पण संघात आहे का तेवढा दम?

RCB तीन वेळा जेतेपदानजीक पोहोचला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 7:09 PM

Open in App
ठळक मुद्देविराट कोहलीनं 2016च्या मोसमात सर्वाधिक धावांचा विक्रम केला, पण उपविजेताच ठरलायूएईत होणाऱ्या IPL 2020त RCBला जेतेपदाचा दावेदार मानलं जात आहे

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वासाठी सर्वच संघांनी रणनीती तयार केली आहे. 2008पासून एकही जेतेपद न जिंकलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challangers Bangalore) संघाकडून यंदाही अपेक्षा असणार आहेत. विराट, एबी डिव्हिलियर्स आदी मोठी आणि ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट खेळाडू संघाकडे आहे, परंतु संघाला गरज असते तेव्हा त्यांच्याकडून साजेशी कामगिरी झालेली नाही, हा इतिहास आहे. पण, तरीही RCBच्या चाहत्यांना यंदा विराट बाजी मारेल असा विश्वास आहे.

RCBनं 2009 ते 2011या कालावधीत सलग तीनवेळा प्ले ऑफमध्ये धडक मारली. 2009 आणि 2011चे ते उपविजेते आहेत. त्यानंतर 2015 व 2016मध्ये त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला, परंतु 2016च्या मोसमात पुन्हा एकदा त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. RCB हा जेतेपदाचा दुष्काळ यंदा संपवतील का?

बलस्थान

ख्रिस गेलनं ( Chris Gayle) साथ सोडल्यानंतर RCBची आघाडीची फळी विस्कळीत झाली आहे. पण, या मोसमात त्यांच्याकडे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरोन फिंच ( Aaron Finch) आणि त्याच्या साथीला पार्थिव पटेल आहेच.विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर फलंदाजी करण्यास सज्ज आहेत. त्यानंतर अष्टपैलू मोईन अली हा पर्याय RCBकडे आहे. ख्रिस मॉरिस हाही सक्षम पर्याय आहेच. त्याशिवाय शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलू खेळाडूंसह पवन देशपांडे हाही पर्याय संघाकडे आहे. 

कमकुवत बाजू  

संघात मोठ मोठी नावं असल्यामुळे गुणवत्ता असलेल्या भारतीय खेळाडूंना पुरेशी संधी मिळत नाही. पहिल्या पाच क्रमांकापर्यंत फिंच, एबी आणि मोईन अली या तिघांचे स्थान पक्के आहे. पंजाबचा फलंदाज गुरकिरत सिंग याला मागील चार पर्वांत केवळ 12 सामने खेळण्याची संधी दिली गेली.  

त्यांचा गोलंदाजी विभाग एवढा तगडा नाही. ही RCBची पूर्वीचीच समस्या आहे. ख्रिस मॉरिस हा यंदा चांगला पर्याय ठरू शकतो. मोहम्मद सिराज, उमेश यादव व नवदीप सैनी हे पर्याय आहेत, परंतु त्यांच्या यशावर RCBची वाटचाल अवलंबून आहे. डेल स्टेन हा अनुभवी गोलंदाज आहे, परंतु त्याला किती संधी मिळते, यावर शंका आहे.

X फॅक्टर विराट कोहली आणि एबी डी'व्हिलियर्स हे तगडे फलंदाज RCBकडे आहेच आणि त्यांच्या मदतीला आता फिंचही दाखल झाला आहे. युजवेंद्र चहलहा हुकमी एक्का ठरू शकतो.

संपूर्ण वेळापत्रक (Royal challengers bangalore Time Table, IPL 2020)

  1. 21 सप्टेंबर, सोमवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
  2. 24 सप्टेंबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
  3. 28 सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
  4. 3 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी
  5. 5 ऑक्टोबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
  6. 10 ऑक्टोबर, शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
  7. 12 ऑक्टोबर, सोमवार - ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
  8. 15 ऑक्टोबर, गुरुवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
  9. 17 ऑक्टोबर, शनिवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
  10. 21 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
  11. 25 ऑक्टोबर, रविवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
  12. 28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
  13. 31 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्घ सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
  14. 2 नोव्हेंबर, सोमवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघएबी डिव्हिलियर्स, देवदत्त पड्डीकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अॅरोन फिंच, डेल स्टेन, उदाना, अहमद, फिलिप, देशपांडे, अॅडम झम्पा, ख्रिस मॉरिस

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020त सुरेश रैनाच्या जागी CSK ट्वेंटी-20तील नंबर वन खेळाडूला ताफ्यात घेणार? 

IPLमधील सर्वोत्तम कर्णधार कोण? आकडेवारी सांगते रोहित शर्मा अन् MS Dhoni नव्हे, तर... 

Indian Premier League 2020मधील टॉप 10 महागड्या खेळाडूंत केवळ चार भारतीय!

आठ दिवसांवर आली IPL 2020; जाणून घेऊया असे 8 विक्रम जे मोडणे अशक्यच!

टॅग्स :आयपीएल 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीएबी डिव्हिलियर्सअ‍ॅरॉन फिंच