Join us  

टीम इंडियाचे खेळाडू सरावाला लागणार, पण विराट अन् रोहित यांना घरीच रहावे लागणार!

18 मे पासून कौशल्य आधारित आऊटडोअर सराव सुरू करण्याची तयारी बीसीसीआयने दाखवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 1:13 PM

Open in App

क्रिकेटची पुन्हा सुरुवात करण्याच्या दृष्टीने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नियम शिथिल झाल्यास 18 मे पासून कौशल्य आधारित आऊटडोअर सराव सुरू करण्याची तयारी बीसीसीआयने दाखवली आहे. कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी गुरुवारी हे संकेत दिले होते. लॉकडाऊनमध्ये अडकलेले भारतीय खेळाडू सध्या घरातच फिटनेसवर भर  देत आहेत. आत दोन महिन्यांनंतर टीम इंडियाचे खेळाडू मैदानावर सराव करताना दिसणार आहेत. पण, टीम इंडियाची कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांना त्यात सहभाग घेता येणार नाही.

Good News : टीम इंडियाला श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यास BCCI तयार, पण...

इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनी लवकरच खेळाडूंच्या सराव शिबीराला सुरुवात करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बीसीसीआयनंही तशी तयारी दर्शवली आहे. त्यानुसार कठोर नियमांचं पालन करून बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतर्फे खेळाडूंच्या सरावाला सुरुवात होणार आहे. पण, विराट व रोहितला त्यात सहभाग घेता येणार नसल्याचे, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले. ते म्हणाले,''मुंबईत लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता येण्याची शक्यता फार कमी असल्यामुळे विराट व रोहित यांना सराव शिबीरात सहभागी होता येणार नाही.''

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला आहे. आतापर्यंत 27 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण मुंबईत सापडले असून 1000 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   

धुमल म्हणाले, ''खेळाडूंनी कौशल्यावर आधारित आऊटडोअर सराव सुरू करावा, असा बीसीसीआयचा विचार आहे, मात्र त्यासाठी आधी सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याची गरज आहे. खेळाडू प्रवास करू शकत नसल्यामुळे आम्ही पर्यायाच्या शोधात आहोत. स्वत:च्या घराजवळ असलेल्या मैदानात त्यांचा सराव होऊ शकतो का, याची चाचपणी केली जात आहे. लॉकडाऊननंतर काय करता येईल, यासाठी आम्ही वेळात्रक तयार केले. स्थानिक मैदानावर खेळाडूंनी सराव सुरू केल्यास नेट सत्रादरम्यान एका फलंदाजासाठी तीन गोलंदाजांची व्यवस्था करता येईल.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

पाकमधील हिंदूंना अन्न वाटप करणारा शाहिद आफ्रिदी बांगलादेशच्या मदतीला धावला

Video : म्युझिक व्हिडीओसाठी लिओनेल मेस्सीचे पत्नीसोबत लिपलॉप; नेटिझन्सकडून ट्रोल

पतीच्या आठवणीनं सानिया मिर्झा भावुक; म्हणाली, इझान आपल्या बाबांना कधी भेटेल माहीत नाही!

Video : अनुष्कानं टाकला विराटला बाऊंसर; विरुष्काचा क्रिकेट सामना पाहिलात का?

 

टॅग्स :बीसीसीआयरोहित शर्माविराट कोहली