Join us  

बसले अन् फसले, क्रमवारीत घसरले; विराट, रोहितला भोवली मालिकेतली विश्रांती

इशान किशनला मात्र दमदार खेळीचा झाला मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 5:57 PM

Open in App

Virat Kohli Rohit Sharma Ishan Kishan, ICC ODI Rankings: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीच्या ICC एकदिवसीय क्रमवारीत घसरण झाली आहे. या दोन्ही फलंदाजांनी मालिकेत फक्त 1 सामना खेळला आणि 2 मध्ये विश्रांती दिली. संघाबाहेर बसल्याने त्यांच्या स्थानात घसरण झाली. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. विराट कोहली फलंदाजीलाही आला नाही. अशा स्थितीत दोन्ही फलंदाजांना एकदिवसीय क्रमवारीत एक स्थान गमवावे लागले. आयसीसीने 2 ऑगस्ट रोजी क्रमवारी अपडेट केली. त्यात रोहित शर्मा टॉप-10 मधून बाहेर पडला.

इशान कुलदीपला फायदा

ताज्या एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहली 8व्या वरून 9व्या तर रोहित शर्मा 10व्या वरून 11व्या स्थानावर घसरला आहे. क्विंटन डी कॉक आणि स्टीव्ह स्मिथ यांनी अलीकडे एकदिवसीय क्रिकेट खेळले नसतानाही प्रत्येकी एक स्थानाची बढती मिळवू शकले आहे. या दरम्यान, इशान किशन आणि कुलदीप यादव यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत त्यांच्या चांगल्या कामगिरीचा फायदा मिळाला.

वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार प्रदर्शन केल्यामुळे कुलदीप यादवने एकदिवसीय गोलंदाजांच्या यादीत आठ स्थानांनी प्रगती करत 14व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने सर्व 3 वनडे खेळून 7 विकेट घेतल्या. इशान किशनने 15 स्थानांची झेप घेत एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत 45वे स्थान पटकावले. मोहम्मद सिराज दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला. त्याने क्रमवारीत एक स्थान गमावले. तो चौथ्या क्रमांकावर आहे.

इशानचा मोठा पराक्रम

संपूर्ण मालिकेत इशान किशनच्या सातत्यपूर्ण फॉर्ममुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावणाऱ्या काही भारतीय खेळाडूंपैकी एक आहे. तो क्रिस श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, एमएस धोनी आणि श्रेयस अय्यर यांच्या पंक्तीत सामील झाला. ही कामगिरी करणारा तो सहावा भारतीय खेळाडू ठरला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माविराट कोहलीइशान किशन
Open in App