Join us  

अनुष्काने केली प्रश्नांची सरबत्ती; रागीट विराट पत्नीसमोर हरला; Video Viral

अनुष्का आणि विराटच्या हा नव्या व्हिडीओत दोघांनी एकमेकांना काही प्रश्न विचारले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 1:14 PM

Open in App

लॉकडाऊनमुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला पत्नी अनुष्का शर्माला पुरेसा वेळ देता आला. लग्नानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत विराट-अनुष्काला केवळ 20 दिवसच सोबत राहता आले होते. टीम इंडियाच्या सततच्या दौऱ्यांमुळे आणि अनुष्काच्या शुटींग शेड्यूलमुळे विरुष्काला एकमेकांना पुरेसा वेळ देता आला नव्हता. पण, लॉकडाऊनमुळे ही उणीव भरून निघाली. ही दोघंही सोशल मीडियावर चाहत्यांना अपडेट्स देत होतेच... विराटचा डायनासोर डान्स असो किंवा अनुष्कासाठी स्वतःच्या हातानं तयार केलेला केक, याची अपडेट्स सोशल मीडियावरून मिळत होती. आता एक नवा व्हिडीओ अनुष्कानं पोस्ट केला आहे आणि त्यात तिनं विराटवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.. ( Anushka Sharma posted a video on social media with Virat Kohli) 

अनुष्का आणि विराटच्या हा नव्या व्हिडीओत दोघांनी एकमेकांना काही प्रश्न विचारले आहेत. विराटनं क्रिकेटविषयक, तर अनुष्कानं चित्रपटांविषयक प्रश्न विचारले. आता यात कोण जिंकलं, ते तुम्हीच पाहा...( Anushka Sharma posted a video on social media with Virat Kohli)

विराट कोहलीनं विचारलेले प्रश्न

  • विराट - मी सोप्या प्रश्नानं सुरुवात करतो... क्रिकेटमधील तीन बेसिक नियम सांग
  • अनुष्का - बाद होऊ नका ( हसत), हार मानू नका.... अजूनही बरेच नियम आहेत, ते मला माहित्येय. पॉवरप्लेमध्ये दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात.. क्रीजबाहेरून गोलंदाजी करू शकत नाही. सीमारेषेपार चेंडू टोलावल्यास तो षटकार असतो. 
  • विराट - वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी महिला क्रिकेटपटू कोण?
  • अनुष्का - याचं उत्तर मला माहित असेल, असं तुला वाटतंय?
  • विराट - नाही.  
  • अनुष्का - झुलन गोस्वामी
  • विराट - क्रिकेटची पंढरी असं कोणत्या ग्राऊंडला म्हटले जाते?
  • अनुष्का - लॉर्ड्स

 

अनुष्कानं विचारले प्रश्न

  • अनुष्का - पहिल्या हिंदी चित्रपटाचं नाव काय?
  • विराट - मला माहीत नाही
  • अनुष्का - राजा हरिश्चंद्र
  • अनुष्का - क्रिकेटवर आधारीत दोन चित्रपटांची नावं सांग
  • विराट - पटियाला हाऊस आणि लगान

अन्य महत्त्वाचे बातम्या

अरे देवा... IPL 2020 सुरू होण्यापूर्वीच माजी विजेत्या संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह! 

खतरनाक लँडींग! Video पाहिल्यावर नुसता घामच नाही तर धडकी भरेल

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना? IPL 2020चे वेळापत्रक व्हायरल

IPL 2020ची टायटल स्पॉन्सरशिप 'पतंजली'ला मिळाली, तर कसा असेल लोगो? फोटो व्हायरल 

बंगालमध्ये सुरक्षित आहे, यूपीत असते तर माझ्यासोबत वाईट झालं असतं; हसीन जहाँनं दाखल केली FIR 

 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा