Virat Kohli Property : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली नेहमी चर्चेत असतो. सध्या तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. पण, ऑस्ट्रेलियाला जाताना विराटने त्याची गुरुग्राम येथील एक संपत्ती त्याच्या मोठ्या भावाच्या नावावर केली आहे. कोहलीच्या मोठ्या भावाचे नाव विकास कोहली आहे.विराटने मोठ्या भावाला तेथील त्याच्या संपूर्ण मालमत्तेसाठी जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी दिली आहे.
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी फक्त एक दिवस आधी १४ ऑक्टोबर रोजी विराट कोहलीने त्याचा मोठा भाऊ विकास याला जनरल पॉवर ऑफ अॅटर्नीचे अधिकार दिले आहेत. हे करण्यासाठी, विराट कोहली गुरुग्राममधील तहसील कार्यालयात गेला आणि सर्व कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. यावेळी सरकारी कार्यालयात त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्याच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढले.
विराट कोहली लंडनमध्ये रहायला गेला?
विराट कोहली त्याच्या पत्नी आणि मुलांसह लंडनमध्ये जास्त दिवस असतो. त्यामुळे गुरुग्राम येथील संपत्तीचे जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी अधिकार भावाला दिले आहेत. जास्त दिवस भारताच्या बाहेर राहत असल्यामुळे विराटने हा निर्णय घेतला आहे.
विराट कोहलीची मालमत्ता किती कोटींची?
विराट कोहलीकडे गुरुग्राममधील डीएलएफ सिटी फेज १ मध्ये एक आलिशान घर आहे, ती त्याने २०२१ मध्ये खरेदी केले होते. याची किंमत ८० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. या व्यतिरिक्त, विराटकडे गुरुग्राममध्ये एक आलिशान फ्लॅट देखील आहे. विकास कोहली याच्याकडे या घरासह फ्लॅटचे व्यवस्थापन करणार आहे. शिवाय, विराट कोहलीच्या सर्व मालमत्तेची एकत्रित किंमत १०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.