Join us  

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून महेंद्रसिंग धोनी अन् विराट कोहलीचा असाही सन्मान

वन डे आणि कसोटी या दोन्ही संघांत कोहलीला स्थान देण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 11:47 AM

Open in App

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दशकातील सर्वोत्तम वन डे आणि कसोटी संघ जाहीर केला. त्यांनी जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम वन डे आणि कसोटी संघाचे नेतृत्व अनुक्रमे महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. वन डे आणि कसोटी या दोन्ही संघांत कोहलीला स्थान देण्यात आले आहे. 31 वर्षीय विराटनं हे दशक गाजवलं. त्याच्या नावावर 70 आंतरराष्ट्रीय शतकं आहेत. रिकी पाँटिंग ( 71) आणि सचिन तेंडुलकर ( 100) हेच आघाडीवर आहेत. कसोटी प्रमाणे वन डेतही विराटची बॅट चांगलीच तळपली आहे. तीनही फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट ( 21444) तिसऱ्या स्थानी आहे. पाँटिंग ( 27483) आणि तेंडुलकर ( 34357) आघाडीवर आहेत.  

कसोटी संघ - अ‍ॅलेस्टर कुल, डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली ( कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, बेन स्टोक्स, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, नॅथन लियॉन, जेम्स अँडरसन

वन डे संघ - महेंद्रसिंग धोनी ( कर्णधार), रोहित शर्मा, हाशिम आमला, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शकीब अल हसन, जोस बटलर, रशीद खान, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, लसिथ मलिंगा 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीविराट कोहलीरोहित शर्मा