Join us  

धक्कादायक; ग्लेन मॅक्सवेलसारखी परिस्थिती विराट कोहलीवरही ओढवली होती!

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं काही दिवसांपूर्वी क्रिकेटमधून ब्रेक घ्यायचे ठरवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 6:00 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं काही दिवसांपूर्वी क्रिकेटमधून ब्रेक घ्यायचे ठरवले होते. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर मॅक्सवेलनं मानसिक आरोग्याचं कारण देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्याच्या या निर्णयानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला, परंतु टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं मॅक्सवेलच्या निर्णयाचं स्वागत केलं. 2014च्या इंग्लंड दौऱ्यात आपणही मानसिक आजाराचा सामना केला होता, असा गौप्यस्फोट कोहलीनं केला.

मॅक्सवेल हा श्रीलंकेविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये खेळला होता. पण तिसऱ्या सामन्यापासून त्याने क्रिकेटमधून ब्रेक घ्यायचे ठरवले आहे. पहिल्या सामन्यात मॅक्सवेलने फक्त 22 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. दुसऱ्या सामन्यात मात्र त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. आयपीएलच्या गेल्या मोसमातही मॅक्सवेल खेळला नव्हता. मॅक्सवेलच्या मानसिक स्थितीबाबत संघाचे फीजियो मायकल लॉईल म्हणाले की, " ग्लेन मॅक्सवेलचे मानसिक आजारातून जात आहे. त्याला मानसिकरीत्या काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीमध्ये आम्ही सर्व त्याच्या पाठिशी असू."

2014च्या इंग्लंड दौऱ्यात कोहलीलाही या समस्येचा सामना करावा लागला होता. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला केवळ 134 धावा करता आल्या होत्या. त्याबाबत कोहलीनं सांगितलं की,''आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघातील प्रत्येक खेळाडूंमध्ये संवाद असणं गरजेचं आहे. ग्लेन मॅक्सवेलनं ही गोष्ट सांगून मोठं काम केलं आहे. कारकिर्दीच्या टप्प्यात मलाही या त्रासाचा सामना करावा लागला होता. तेव्हा वाटलं की जग संपलं. काय करावं, कोणाला सांगावं काहीच कळत नव्हतं.''  

टॅग्स :विराट कोहलीग्लेन मॅक्सवेल