Join us  

IND VS WI: 24 व्या शतकासह विराटने घातली नव्या विक्रमांना गवसणी

पदार्पणवीर पृथ्वी शॉने खणखणीत शतक ठोकत वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीचा पहिला दिवस गाजवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या दिवसाच्या खेळावर छाप पाडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 11:40 AM

Open in App

राजकोट - पदार्पणवीर पृथ्वी शॉने खणखणीत शतक ठोकत वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीचा पहिला दिवस गाजवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या दिवसाच्या खेळावर छाप पाडली. विराटने एक बाजू लावून धरत आपले 24 वे कसोटी शतक पूर्ण केले. या शतकासोबतच विराटने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवागला मागे टाकत चौथे स्थान पटकावले आहे. तसेच अवघ्या 72 कसोटीत 24 शतके फटकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 

विराट कोहनीने आपल्या 72 व्या कसोटीत 123 डावांमध्ये 24 शतके पूर्ण केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 125 तर सुनील गावसकर यांनी 128 डावांत 24 शतकांचा टप्पा गाठला होता. महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी केवळ 66 डावांत 24 शतके फटकावली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध आज फटकावलेले शतक हे विराटचे यंदाच्या वर्षातील हे चौथे कसोटी शतक ठरले आहे. तसेच तर कर्णधार म्हणून विराटने फटकावलेले 17वे कसोटी शतक ठरले आहे. त्याबरोबरच विराटने या खेळीदरम्यान घरच्या मैदानांवरील तीन हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. 

राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने संयमी फलंदाजीचे प्रदर्शन करत शतकाला गवसणी घातली. विराटचे कसोटी क्रिकेटमधील 24 वे शतक होते. विशेष म्हणजे भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके फटकावणारा विराट हा चौथा फलंदाज ठरला आहे. या क्रमवारीत 51 शतकांसह सचिन तेंडुलकर पहिल्या, 36 शतकांसह राहुल द्रविड दुसऱ्या, 34 शतकांसह सुनील गावसकर तिसऱ्य़ा स्थानावर आहेत.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहली