Join us  

विराट कोहलीवर आली ही वाईट पाळी, जगविख्यात फलंदाज गोलंदाजांच्याही खाली

एकेकाळी धावांची टांकसाळ उघडणाऱ्या कोहलीला कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये एकदाही २० ही धावसंख्या गाठता आलेली नाही. ही गोष्ट कोहलीसाठी नक्कीच गंभीर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 6:48 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यावर समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. कोहलीला कसोटी मालिकेत केवळ 38 धावा करता आल्या आणि भारताच्या पराभवामागचं हे एक प्रमुख कारण आहे. टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करावी लागली. न्यूझीलंडने 7 विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली.

न्यूझीलंडचा दौरा हा भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी सर्ता वाईट गेल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या दौऱ्यात कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही. कसोटी मालिकेत तरी विराटला २० धावाही करता आलेल्या नाहीत. एकेकाळी धावांची टांकसाळ उघडणाऱ्या कोहलीला कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये एकदाही २० ही धावसंख्या गाठता आलेली नाही. ही गोष्ट कोहलीसाठी नक्कीच गंभीर आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यावर समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्याला कसोटी मालिकेत केवळ 38 धावा करता आल्या आणि भारताच्या पराभवामागचं हे एक प्रमुख कारण आहे. टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करावी लागली. न्यूझीलंडने 7 विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली. कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यात 11 डावांमध्ये केवळ 218 धावा करता आल्या. या मालिकेत भारताकडून सर्वात कमी धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान त्याला मिळाला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. या दोन सामन्यांतील चार धावांमध्ये मिळून कोहलीला फक्त ३८ धावाच करता आल्या. कोहलीपेक्षा जास्त धावा तर तीन गोलंदाजांनी या मालिकेत केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोहलीवर प्रचंड दडपण वाढलेले आहे. त्यामुळे एका पत्रकार परिषदेमध्ये तर तो चांगलाच चिडलेला पाहायला मिळाला.

या कसोटी मालिकेत कोहलीने ९.५० च्या सरासरीने ३८ धावा केल्या. या मालिकेत धोनीपेक्षा जास्त धावा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने केल्या आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडचे कायले जेमिन्सन आणि ट्रेंट बोल्ट यांनीदेखील कोहलीपेक्षा जास्त धावा या मालिकेत केल्याचे पाहायला मिळाले आहे.

पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार कोहली पत्रकारावर चांगलाच भडकला. या सामन्यात कोहलीच्या आक्रमकतेचीही चर्चा रंगली. केन विलियम्सन बाद झाल्यानंतर कोहलीनं ज्या पद्धतीनं प्रेक्षकांकडे पाहून अपशब्द वापरले आणि जल्लोष केला, त्यावर टीका झाली. पत्रकाराने त्याबाबत कोहलीला प्रश्न विचारला.

पत्रकार - केन विलियम्सन बाद झाल्यानंतर त्याला आणि प्रेक्षकांना डिवचण्याच्या तुझ्या कृतीबाबत तू काय सांगशील? एक कर्णधार म्हणून तुला एक आदर्श ठेवायला हवा, असं वाटत नाही का?कोहली - तुम्हाला काय वाटतं?  पत्रकार - मी तुला प्रश्न विचारला आहे? कोहली - मैदानावर नेमकं काय घडलं हे तू जाणून घ्यायला हवं आणि त्यानंतर प्रश्न विचारायला हवा. त्रोटक माहीती घेऊन मला प्रश्न विचारणे चुकीचे आहे. आणि हो तुला विवाद निर्माण करायचा आहे, तर ही योग्य जागा नाही. मी मॅच रेफरींसोबत चर्चा केली, त्यांना या प्रकरणात काहीच चुकीचे वाटले नाही. धन्यवाद.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंडमोहम्मद शामी