Join us  

IND vs NZ ODI : कोहली मोडणार विरूचे विक्रम, न्यूझीलंडमध्येही करणार का पराक्रम?

भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. न्यूझीलंड दौऱ्यातही त्याला अनेक विक्रम खुणावत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 1:37 PM

Open in App
ठळक मुद्देभारत-न्यूझीलंड पहिला वन डे सामना 23 जानेवारीपासूनकर्णधार विराट कोहलीला अनेक विक्रम मोडण्याची संधी

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याने आपल्या कामगिरीतून ते सिद्धही केले आहे. त्यामुळे त्याची प्रत्येक खेळी ही विक्रमीच ठरत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याची प्रचिती आली आणि आता न्यूझीलंड दौऱ्यातही त्याला अनेक विक्रम खुणावत आहेत. भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडण्याची संधी कोहलीला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर पाच शतकं आहेत आणि त्याला सेहवागचा विक्रम मोडण्यासाठी या दौऱ्यावर दोन शतकं करावी लागणार आहेत. न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक सहा शतकं करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे. या विक्रमात कोहली महान फलंदाज सचिन तेंडुलकरसह (5) संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

शतकांच्या विक्रमासह कोहलीला सेहवागचा आणखी एक विक्रम खुणावत आहे. न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सेहवाग दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 23 डावांत 1157 धावा केल्या असून कोहलीला हा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला अवघ्या चार धावा हव्या आहेत. कोहलीच्या नावावर 19 डावांत 1154 धावा आहेत. या क्रमवारीत तेंडुलकर 1750 धावांसह अग्रस्थानावर आहे. 

न्यूझीलंडमध्ये त्यांच्याचविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये कोहली सातव्या स्थानावर आहे. सध्याच्या संघातील रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी हे आघाडीवर आहेत.

 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंडविरेंद्र सेहवागसचिन तेंडुलकर