Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीला भावली अभिनव मुकुंदची 'ही' दणकेबाज फटकेबाजी

'केवळ गोरे असणे म्हणजे सुंदर नव्हे' असे सुनावत भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर अभिनव मुकुंदने...

By sagar.sirsat | Updated: August 11, 2017 11:26 IST

Open in App

मुंबई, दि. 10 - 'केवळ गोरे असणे म्हणजे सुंदर नव्हे' असे सुनावत भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर अभिनव मुकुंदने वर्णद्वेष करणाऱ्यांना ट्विटर पोस्टच्या माध्यमातून फटकारले होते. ट्विटरवर त्याने केलेली ही फटकेबाजी अनेक क्रीडापटूंना भावली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, अष्टपैलू रवीचंद्रन अश्विन, हार्दिक पंड्या याच्यासह अनेक खेळाडूंनी मुकुंदचं कौतूक केलं आहे. 'व्हेरी वेल सेड अभिनव' अशी दाद विराटने दिली तर 'वाचा आणि धडा घ्या' अशा शब्दांत अश्विनने मुकुंदचं समर्थन केलं. बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानेही मुकुंदच्या धाडसी पोस्टचं कौतुक केलं. 

अभिनव मुकंदने केलेली पोस्ट- वयाच्या दहाव्या वर्षापासून मी क्रिकेट खेळता-खेळता आता मी इथपर्यंत प्रवास केला आहे. या स्थरावर देशाचं प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मी आज हे लिहीतोय ते तुमचं लक्ष्य वेधण्यासाठी नव्हे तर यामुळे लोकांचे विचार बदलतील म्हणून.  15 वर्षांचा असल्यापासून मला देशाबाहेर व देशांतर्गत अनेकदा फिरण्याची संधी मिळाली. माझ्या रंगामुळे अनेकांना असलेला तिरस्कार मी पाहिला. जो क्रिकेट खेळतो किंवा ज्याला क्रिकेट कळतं तो हे नीट समजू शकेल. क्रिकेट खेळण्यासाठई मी तळपत्या उन्हातही घाम गाळला आहे. पण त्यामुळे माझा रंग काळा होत असल्याची अजिबात खंत माझ्या मनात नाही. कारण मी जी गोष्ट मी करतो त्यावर माझं मनापासून प्रेम आहे आणि ते मिळवण्यासाठी मी तासनतास मेहनत घेतली आहे. लोकांनी मला अनेक नावं ठेवली, पण त्यावर मी फक्त हसून पुढे जाण्याचं काम केलं. कोणालाही उलट उत्तर दिलं नाही. पण आज मी केवळ माझ्यासाठीच नाही तर अन्य लोकांसाठीही बोलतोय...सोशल मीडिया आल्यापासून अशा गोष्टींचं प्रमाण वाढलंय,  वर्णभेदावरून अभद्र  टिप्पण्या कऱण्याचं प्रमाण वाढलंय, जे लोक सोशल मीडियात माझ्यासारख्या लोकांवर वर्णभेदाची टिप्पणी करतात त्यांनी आपला छोटा विचार बदलण्याची गरज आहे. केवळ गोरे लोकच हॅन्डसम असतात असं नाही असं अखेरीस लिहून त्याने रंगावरून टीका करणा-यांना चोख उत्तर दिलं आहे.