Join us  

'विराट' लक्ष्य पार; कोरोना लढ्यासाठी जमा झाले जवळपास ११ कोटी; विराट-अनुष्काच्या मोहिमेचे अजून दोन दिवस बाकी

virat kohli & anushka sharma covid 19 fundraiser विराट कोहली ( Virat Kohli) आणि त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी कोरोना लढ्यात हातभार लावण्यासाठी एक चळवळ उभी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 5:03 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगचे 14वे पर्व स्थगित झाल्यानंतर मुंबईतील घरात पोहोचल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी कोरोना लढ्यात हातभार लावण्यासाठी एक चळवळ उभी केली. त्यांच्या या प्रयत्नांना बुधवारी मोठं यश आलं. विराट सदिच्छादूत असलेल्या MPL या फँटसी लीग अॅपनं 5 कोटींची मदत जाहीर केली. त्यामुळे 7 कोटींचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन विराट व अनुष्का यांनी सुरू केलेल्या या चळवळीतून आता 11 कोटी निधी गोळा झाला आहे. विराटनं सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी दिली. 

''MPL Sports Foundation चे मी आभार मानू इच्छितो. आम्ही सुरू केलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी त्यांनी 5 कोटींची मदत केली आहे. त्यांच्या या मदतीमुळे आम्ही आमचे लक्ष्य 11 कोटींपर्यंत वाढवले आहे. अनुष्का आणि मी तुमचा पाठींबा पाहून भावूक झालो आहोत,''असे विराटनं ट्विट केलं.   देशातील आरोग्य यंत्रणा न थकता, न थांबता कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहेत. पण, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आपल्या आरोग्य यंत्रणेलाच आव्हान दिलं आहे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला मदत करण्याची गरज आहे.  अनुष्का आणि मी Kettoवर एक मोहीमु सुरू केली आहे. त्यातून जमा होणार निधी हा कोरोना लढ्यासाठी वापरला जाणार आहे, असे आवाहन विराट-अनुष्कानं केलं होतं.

विराट कोहलीचा आयपीएलमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हेही कोरोना लढ्यासाठी काम करत आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं तामीळनाडू सरकारला 450 ऑक्सिजन संच दिले, सनरायझर्स हैदराबादनं 30 कोटी, तर राजस्थान रॉयल्सनं 7.5 कोटींची मदत केली. शिवाय पॅट कमिन्स, ब्रेट ली, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, शेल्डन जॅक्सन, शिखर धवन आदी खेळाडूंनीही हातभार लावला आहे.  

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माकोरोना वायरस बातम्या