Join us  

विराट कोहली, स्मृती मानधना यांचा 'विस्डन'कडून गौरव

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना बुधवारी विस्डनकडून वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 2:12 PM

Open in App

लंडन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना बुधवारी विस्डनकडून वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. कोहलीला सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान हा सलग दुसऱ्या वर्षी ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. विस्डन क्रिकेटर ऑफ दी इयर पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्येही कोहलीने स्थान पटकावले आहे. त्याच्यासह पाच खेळाडूंत टॅमी बीयूमोंट, जोस बटलर, सॅम कुरन आणि रॉरी बर्न्स यांचा समावेश आहे.  1889 पासून विस्डन क्रिकेट पुरस्कार दिला जातो. कोहलीला सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळणार आहे. त्याने तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 2735 गुणांची कमाई केली आहे. इंग्लंडमध्येही कोहलीचा बॅट चांगलीच तळपली होती. तेथे पाच कसोटी सामन्यांत त्याने 59.3 च्या सरासरीने 593 धावा केल्या होत्या.  

महिला क्रिकेटपटूंत मानधनाची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. तिने 2018 मध्ये वन डे व ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 669 व 662 धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला सुपर लीग ट्वेंटी-20त तीने 174.68 च्या स्ट्राईक रेटने 421 धावा केल्या आहेत आणि त्यात एका शतकाचाही समावेश आहे.  

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय