Join us  

कर्णधार म्हणून कोण बेस्ट, विराट की रोहित? अवघड प्रश्नाचं युजवेंद्र चहलनं दिलं सहज उत्तर 

कुलदीप यादवच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांत युजवेंद्र चहल हा प्रमुख फिरकीपटू असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 2:07 PM

Open in App

कुलदीप यादवच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांत युजवेंद्र चहल हा प्रमुख फिरकीपटू असणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्याही नेतृत्वाखाली चहलनं अनेक अविस्मरणीय गोलंदाजी केली आहे. पण, या दोघांमधील चांगला कर्णधार कोण, असा प्रश्न समोर येतो तेव्हा अनेकांची उत्तर ही न पटणारी किंवा ती कृत्रिम वाटतात. युजवेंद्रलाही हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं काय उत्तर दिलं चला पाहूया...

तो म्हणाला,'' कोहली आणि रोहित या दोघांचाही दृष्टीकोन एकसारखा आहे. दोघंही गोलंदाजांना स्वातंत्र्य देतात. त्यांचा गोलंदाजांना संपूर्ण पाठिंबा असतो आणि क्षेत्ररक्षण लावण्याचीही परवानगी देतात. त्यामुळे या दोघांमध्ये फार काही फरक नाही. रोहितपेक्षा विराट हा अधिक आक्रमक आहे. खेळाडूंना मोकळीक देणं आणि संघाला विजय मिळवून देणं, हेच दोघांचं अंतिम ध्येय आहे. त्यांच्या याच स्वातंत्र्यामुळे खेळाडूंना मदत मिळते.''बांगलादेशविरुद्धच्या तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत रोहितनं टीम इंडियाचं नेतृत्व केलं. या मालिकेत रोहित वारंवार चहलशी गोलंदाजी करताना बोलत असल्याचे पाहायला मिळाले. त्याबद्दल विचारले असता चहल म्हणाला,'' आम्ही DRS बाबत चर्चा करत होतो. मस्करी करतोय. रोहित माझा आत्मविश्वास वाढवत होता. मी दोन-तीन मालिकांनंतर कमबॅक करत होतो. त्यामुळे भुतकाळाविषयी विचार करू नकोस, असं तो मला सांगत होता.''  

  • भारतीय संघ ट्वेंटी-20 - विराट कोहली, युजवेंद्र चहल, दीपक चहर, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर.
  • वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अ‍ॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स, 

विंडीज मालिकेचे वेळापत्रक⦁    ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - हैदराबाद8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - मुंबई ⦁    वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजयुजवेंद्र चहलविराट कोहलीरोहित शर्मा