Join us  

अशी ही बनवाबनवी... बीसीसीआयचं दिग्दर्शन अन् कोहली-रोहित मुख्य भूमिकेत?

भारतीय संघात दुफळी... कॅप्टन कोहली अन् रोहित असे दोन गट... रोहितनं अनुष्काला केलं अनफॉलो... त्यावर अनुष्कानं दिलेलं उत्तर... वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंतर सुरू झालेल्या या चर्चा वायफळ होत्या हे सोमवारी स्पष्ट झाले... 

By स्वदेश घाणेकर | Published: July 30, 2019 12:33 PM

Open in App

भारतीय संघात दुफळी... कॅप्टन कोहली अन् रोहित असे दोन गट... रोहितनं अनुष्काला केलं अनफॉलो... त्यावर अनुष्कानं दिलेलं उत्तर... वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंतर सुरू झालेल्या या चर्चा वायफळ होत्या हे सोमवारी स्पष्ट झाले... 

निवडणुका आल्या की राजकीय पक्ष नागरिकांचे मुद्दे सोडून एकमेकांवर चिखलफेक करतात. त्यानं लोकांचं ( माध्यमांचं) मनोरंजन होतं आणि महत्त्वाचे मुद्दे बाजूला कधी फेकले जातात हेच कळत नाही. तसेच काहीसे क्रिकेटमध्येही सुरू आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयश झाकण्यासाठी किंबहुना त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठीच कोहली-रोहित वाद निर्माण करण्यात आला, तशा बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या गेल्या, त्यामुळे वर्ल्ड कपनंतर गेले कित्येक दिवस रोहित-कोहली हेच नाट्य सुरू राहिले आणि प्रत्येक दिवशी तोच धडा नव्या रुपानं मांडण्यात आला. काल कोहलीनं त्याचा शेवट केला.

India Vs West Indies : टीम इंडियातील दुफळीवर प्रथमच कॅप्टन कोहलीनं मांडलं मत, म्हणाला...

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर खरं तर कोहली आणि रवी शास्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं. पण ते झालं नाही. यशाचे श्रेय घ्यायला पुढे पुढे करणारी ही जोडी अपयश आल्यावर तितक्याच तत्परतेनं पळ काढते, याची पुन्हा प्रचिती आली. त्यामुळे वर्ल्ड कप अपयशाचे उत्तर देण्यासाठी कोहली-शास्त्री यांच्यापैकी एकानेही पुढाकार घेतला नाही.

पण वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद होईल आणि तेव्हा वर्ल्ड कप अपयशाची कारणं द्यावी लागतील, याचा अंदाज होता. म्हणून तर त्यावरून दिशाभूल करण्यासाठी कोहली-रोहित वादाच्या बातम्या पेरल्या गेल्या का? कालच्या पत्रकार परिषदेतून याचे फलित कोहली- शास्त्रीला मिळाल्याचे दिसले. या संपूर्ण पत्रकार परिषदेत कोहली-रोहित हाच चर्चेचा विषय ठरला.

वर्ल्ड कप मध्ये का हरलो? कोठे चुकलो ? काय करायला हवं होतं ? हे काहीच नाही. साधारण 5-6 प्रश्न विचारले गेले. त्यातील 4 प्रश्न हे कोहली- रोहित नाट्यासंबंधित होते. उर्वरित दोन विंडीज दौऱ्याचे. मग काय कोहली- शास्त्री हसतहसत विंडीजला रवाना झाले.

बनवाबनवी नाट्याचा हा पहिला भाग!

दुसऱ्या भागात प्रशिक्षकपदावर कोण, हा मुद्दा असणार आहे. त्याची काडी कोहलीनं कालच टाकली. क्रिकेट सल्लागार समिती मत विचारत नाही. पण विचारल्यास शास्त्रींनाच संघाची ( कोहलीची) पसंती आहे, असं कळवेन, असे कोहलीनं काल सांगितले. त्यामुळे बनवाबनवी सुरूच राहणार आणि मनोरंजनाच्या नावाखाली क्रिकेटचाहत्यांची दिशाभूलही होत राहणार...

India Vs West Indies : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोहलीला हवीय 'ही' व्यक्ती, पण...

 

टॅग्स :बीसीसीआयविराट कोहलीरवी शास्त्रीरोहित शर्माअनुष्का शर्माभारत विरुद्ध वेस्ट इंडिज