Join us  

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये जुंपली

हैदराबादमध्ये बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची एक बैठक झाली. या बैठकीला भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, दोन्ही कर्णधार कोहली आणि रोहित हे उपस्थित होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 7:09 PM

Open in App
ठळक मुद्देबैठकीमध्ये विराट आणि रोहित यांच्यामध्ये वादविवाद झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

हैदराबाद : भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन कर्णधारांमध्ये चांगलीच जुंपल्याचे वृत्त पुढे येत आहे. बीसीसीआयची हैदराबादमध्ये नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीमध्ये विराट आणि रोहित यांच्यामध्ये वादविवाद झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

हैदराबादमध्ये बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची एक बैठक झाली. या बैठकीला भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, दोन्ही कर्णधार कोहली आणि रोहित हे उपस्थित होते. यावेळी भारताच्या आगामी दौऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकाबाबतची बातचीत करण्यात आली.

इंग्लंडमधील विश्वचषकात भारताची कामगिरी चांगली कशी करता येईल, हा विषय निघाला. विश्वचषकात खेळताना खेळाडू ताजेतवाने असायला हवेत, असे कोहलीला वाटत होते. पण दुसरीकडे खेळाडूंनी आयपीएल खेळायचे किंवा नाही, हा प्रश्न उपस्थित राहीला. कोहलीने आयपीएल खेळू नये, असे सांगितले. पण संघ बाद फेरीत आला तर काय करायचे, असा सवाल रोहितने उपस्थित केला होता. या गोष्टीवरून कोहली आणि रोहित यांच्यामध्ये वाद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्मारवी शास्त्रीबीसीसीआय