विराट आणि अनुष्का न्यूझीलंडच्या जंगलात...

या फोटोला 6.20 लाख लाइक्स और 4622 कमेंट्स आल्या असून हा फोटो चांगलाच वायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 05:48 PM2019-02-05T17:48:38+5:302019-02-05T17:49:25+5:30

whatsapp join usJoin us
Virat kohli and Anushka sharma in theforest of New Zealand ... | विराट आणि अनुष्का न्यूझीलंडच्या जंगलात...

विराट आणि अनुष्का न्यूझीलंडच्या जंगलात...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा कर्णधार विराट कोहलीने सध्या विश्रांती घेण्याचे ठरवले आहे. विराटने आता पत्नी अनुष्का शर्माबरोबर काही काळ व्यतित करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे विराट आणि अनुष्का यांनी न्यूझीलंडमध्ये राहण्याचे ठरवले आहे. या दोघांनी न्यूझीलंडची जंगल सफारी केली आहे.

न्यूझीलंडच्या जंगलात फिरतानाचे फोटो विराटने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोला 6.20 लाख लाइक्स और 4622 कमेंट्स आल्या असून हा फोटो चांगलाच वायरल झाला आहे.


भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-20 लढतीत न्यूझीलंडचे पारडे जड
भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिका सहा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. आतापर्यंत जर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये यजमानांचे पारडे जड आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत 9 ट्वेंटी-20 सामने झाले आहेत. या 9 ट्वेंटी-20 सामन्यांपैकी न्यूझीलंडने सहा लढतींमध्ये विजय मिळवला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 2007 साली पहिला ट्वेंटी-20 सामना खेळवला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंडनेच बाजी मारली होती. त्यानंतर सलग दहा वर्षे भारताला न्यूझीलंडवर ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवता आला नव्हता.  

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील द्विदेशीय मालिकांचा निकाल

भारताचा न्यूझीलंड दौरा (2008/09)- न्यूझीलंडने 2-0 (2) फरकाने मालिका जिंकली.
न्यूझीलंडचा भारत दौरा (2012)- न्यूझीलंडने 1-0 (2) फरकाने मालिका जिंकली.
न्यूझीलंडचा भारत दौरा (2017/18)- भारताने 3 सामन्यांची सीरीज 2-1 फरकाने मालिका जिंकली.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. रोहितने 12 ट्वेंटी-20 सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि त्यात 11 विजय मिळवण्यात भारताला यश आले. दुसरीकडे कोहलीने 20 ट्वेंटी-20 सामन्यांत नेतृत्व करताना भारताला 12 विजय मिळवून दिले आहेत. रोहितला आगामी ट्वेंटी-20 मालिकेत विजय मिळवून कर्णधार म्हणून कोहलीचा सर्वाधिक ट्वेंटी-20 सामने जिंकण्याचा विक्रम नावावर करण्याची संधी आहे. या विक्रमात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 41 विजयांसह ( 72 सामने) आघाडीवर आहे. 

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ( किमान पाच सामने) भारतीय कर्णधार म्हणून रोहितची विजयाची टक्केवारी अधिक आहे. रोहितची विजयी टक्केवारी 91.66 इतकी आहे, तर कोहलीची टक्केवारी 63.15 अशी आहे. वीरेंद्र सेहवाग (1 सामना) आणि सुरेश रैना ( 3) यांची कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी 100 इतकी आहे. 

Web Title: Virat kohli and Anushka sharma in theforest of New Zealand ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.