Join us  

Yuvraj Singh's Retirement: विराट कोहलीसह दिग्गजांनी दिल्या युवीला शुभेच्छा; वाचा कोण काय म्हणालं!

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात युवराज सिंगने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 4:48 PM

Open in App

मुंबई : भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार युवराज सिंग याने आंतरराष्ट्रीय किक्रेटमधून निवृत्ती घेत असल्याचे सोमवारी जाहीर केले. या निर्णयामुळे युवराज सिंगचे चाहते, तसेच सहकारी आणि खेळाडू भावूक झाले असून त्यांनी युवराज सिंगसोबत असलेल्या आपल्या आठवणी ताज्या केला आहेत. तसेच, त्याच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहलीने सुद्धा युवराज सिंगला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहली म्हणाला, '"पाजी, देशासाठी खेळलेल्या उत्कृष्ठ करियरबद्दल अभिनंदन. आम्हाला तुम्ही अनेक आठवणी आणि विजय दिले. पुढील प्रत्येक गोष्टींसाठी माझ्याकडून आपल्याला शुभेच्छा."

विराट कोहली शिवाय क्रिकेटपटू आकाश चोप्रा, सुरेश रैना, मोहम्मद कैफ, विरेंद्र सेहवाग आणि प्रग्यान ओझा यांनीही युवराज सिंगला शुभेच्छा दिल्या आहे. याचबरोबर, अनुष्का शर्मासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सुद्धा युवराज सिंगसोबत असलेल्या आठवणींना उजाळा देत त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात युवराज सिंगने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.  त्याने 2012मध्ये अखेरची कसोटी, तर 2017मध्ये अखेरच्या मर्यादित षटकांचा सामना खेळला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही त्याने यंदा मुंबई इंडियन्सकडून केवळ 4 सामने खेळले. त्यात त्याने एका अर्धशतकासह 98 धावा केल्या. ही घोषणा करताना युवी भावूक झाला होता... 17 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले. क्रिकेटने मला सर्व काही दिलं आणि म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे, असे तो म्हणाला. 

गेली दोन वर्ष युवराज भारताकडून एकही वन डे किंवा ट्वेंटी -20 सामना खेळलेला नाही. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारण्याचे ठरवले आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मान्यतेने होणाऱ्या परदेशातील ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अशी अट त्याने ठेवली होती. 

युवीनं 40 कसोटी सामन्यांत 33.92 च्या सरासरीनं 1900 धावा केल्या आणि 9 विकेट्सही घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 304 सामने आहेत आणि त्यात त्याने 36.55च्या सरासरीनं 8701 धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 111 विकेट्सही आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 58 सामन्यांत 1177 धावा व 28 विकेट्स घेतल्या आहेत.

 

2011च्या वर्ल्ड कप विजयाचा हिरो युवराज सिंगची निवृत्ती 

निवृत्तीनंतर युवराज करणार समाजासाठी काही तरी, काय ते जाणून घ्या!

युवराजनं निवृत्ती घेण्याचं कधी ठरवलं, हे आहे उत्तर!

निवृत्तीच्या निर्णयाबाबत तेंडुलकरनं दिला युवीला 'हा' सल्ला!

युवीला 'या' एका गोष्टीची राहील आयुष्यभर खंत!

'या' खेळाडूमध्ये युवी पाहतो स्वतःची छबी!

टॅग्स :युवराज सिंगविराट कोहलीअनुष्का शर्माविरेंद्र सेहवाग