विराटने गुंतवणूक केलेली कंपनी टीम इंडियाची ‘किट प्रायोजक’

लाभाच्या पदाचा संघर्ष गाजणार. सजदेह हे कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट कंपनीचे एक संचालक असून त्यांच्याकडे कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि उमेश यादव या खेळाडूंच्या व्यावसायिक हक्कांचे व्यवस्थापन करण्याचे काम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 05:06 AM2021-01-07T05:06:18+5:302021-01-07T05:06:34+5:30

whatsapp join usJoin us
Virat-invested company Team India's 'Kit Sponsor' | विराटने गुंतवणूक केलेली कंपनी टीम इंडियाची ‘किट प्रायोजक’

विराटने गुंतवणूक केलेली कंपनी टीम इंडियाची ‘किट प्रायोजक’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने एमपीएल या गेमिंग कंपनीत २०१९ ला गुंतवणूक केली. ती कंपनी बीसीसीआयच्या प्रायोजकांपैकी एक असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे लाभाच्या पदाचा संघर्ष नव्याने गाजण्याची शक्यता नाकारात येत नाही.


 टीम इंडियाच्या किट प्रायोजकसाठी बीसीसीआय आणि एमपीएल यांच्यात तीन वर्षांचा करार गेल्यावर्षी झाला. नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२३ पर्यंत हा करार करण्यात आला असून यामार्फत बीसीसीआयला प्रत्येक सामन्यामागे ६५ लाखांचा निधी मिळणार आहे. लॉकडाऊन काळात टीम इंडियाचा किट प्रायोजक असलेल्या ‘नाईकी’ कंपनीने करार वाढवून घेणार नसल्याचे जाहीर केले होते. यामुळे बीसीसीआयने नवीन प्रायोजक म्हणून एमपीएलसोबत करार केला आहे.


त्याआधी, फेब्रुवारी २०१९ मध्ये एमपीएलची एक स्वसाधारण सभा पार पडली होती. यामध्ये विराट कोहली तसेच कॉर्नरस्टोन नावाच्या कंपनीला कर्जरोखे देण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉर्नरस्टोन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सजदेह हे मॅगपी व्हेंचर्स पार्टनर्स एलएलपी आणि विराट कोहली स्पोर्ट्स एलएलपीमध्ये विराट कोहलीचे भागीदार आहेत. 


सजदेह हे कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट कंपनीचे एक संचालक असून त्यांच्याकडे कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि उमेश यादव या खेळाडूंच्या व्यावसायिक हक्कांचे व्यवस्थापन करण्याचे काम आहे. विराटचे एमपीएलमध्ये हितसंबंध गुंतले असल्याने त्याच्या चिंतेत भर पडणार असून दुसरीकडे बीसीसीआयदेखील अडचणीत येऊ शकते.

n बेंगळुरु येथील गॅलॅक्टस फनवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये विराट कोहलीने गुंतवणूक केली होती. मोबाईल प्रीमियर लीग (एमपीएल) हा ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म याच कंपनीच्या मालकीचा आहे. 
n सिंगापूरमध्ये एप्रिल २०१८ मध्ये या कंपनीची नोंदणी करण्यात आलेली आहे. जानेवारी २०२० मध्ये विराट कोहली एमपीएलचा ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचे घोषित करण्यात आले होते.

Web Title: Virat-invested company Team India's 'Kit Sponsor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.