Join us  

चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीला बसला अजून एक धक्का, झाला 12 लाखांचा दंड

- प्रथम फलंदाजी करताना दोनशेहून अधिक धावा फटकावल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला अजून एक धक्का बसला असून....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 11:51 AM

Open in App

नवी दिल्ली - प्रथम फलंदाजी करताना दोनशेहून अधिक धावा फटकावल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला अजून एक धक्का बसला असून, सामन्यातील षटकांच्या संथ गतीमुळे त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान बंगळुरूने षटकांची गती संथ राखली होती. त्यामुळे षटकांच्या गतीबाबत आपीएलने बनवलेल्या नियमावलीचा भंग झाला होता. मात्र यंदाच्या मोसमातील षटकांच्या गतीबाबत बंगळुरूकडून झालेली ही पहिलीच चूक आहे. त्यामुळे विराट कोहलीला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, क्विंटन डी कॉक आणि कोरी अँडरसन असे स्टार खेळाडू असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची यंदाच्या हंगामातील कामगिरी यथातथाच झाली आहे. आरसीबीचा संघ यंदाच्या हंगामात खेळलेल्या सहा पैकी पाच सामन्यांत पराभूत झाला आहे. बुधवारी चेन्नई सुपरकिंग्स विरोधात झालेल्या सामन्यात बंगळुरूने 20 षटकात 8 बाद 205 धावा फटकावल्या होत्या. मात्र अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंग धोनीने केलेल्या तुफान फलंदाजीसमोर हे आव्हान खुजे ठरले. चेन्नईने मोठ्या आव्हानाचा तुफान पाठलाग करताना 20 व्या षटकात दोन चेंडू राखून विजय मिळवला होता. या लढतीत स्वत: विराट कोहली हा सुद्धा अपयशी ठरला. त्याला केवळ 8 धावाच जमवता आल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे या लढतीत एकूण 33 षटकार ठोकले गेले. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कुठल्याही सामन्यात फटकावण्यात आलेले हे सर्वाधिक षटकार ठरले आहेत.  

टॅग्स :आयपीएलआयपीएल 2018विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरक्रिकेट