Join us

विराट सर्व विक्रम मोडू शकतो : वकार

भारतीय कर्णधार विराट कोहली आगामी वर्षांमध्ये फलंदाजीतील सर्व विक्रमांवर नाव कोरेल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:53 IST

Open in App

कराची : भारतीय कर्णधार विराट कोहली आगामी वर्षांमध्ये फलंदाजीतील सर्व विक्रमांवर नाव कोरेल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने व्यक्त केले.वकार म्हणाला, ‘कोहली फिटनेस राखण्यावर विशेष भर देतो. त्यामुळे एकाग्रता व कौशल्यासह क्रिकेटचा आनंद घेतो. माझ्या मते आगामी काही वर्षांमध्ये तो फलंदाजीतील सर्व विक्रम मोडेल.’गेल्या वर्षी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकदाचा राजीनामा देणाºया या माजी वेगवान गोलंदाजाने यापूर्वी कोहली समकालीन क्रिकेटपटूंमध्ये सर्वोत्तम असल्याचे म्हटले होते. आपल्या काळातील सर्वोत्तम फलंदाजाबाबत चर्चा करताना वकार म्हणाला, की गेल्या दशकात क्रिकेटमध्ये मोठे बदल झाले आहेत, पण कोहलीची फिटनेसप्रति असलेली जागरुकता आणि फलंदाजी तंत्रामधील सुधारणा बघितल्यानंतर त्याला अव्वल स्थान द्यायला हवे.’ त्याची क्षमता लक्षाता घेत फलंदाजीतील अनेक विक्रम तो आपल्या नावावर करेल.’ क्रिकेटमधील दोन महान फलंदाज सचिन तेंडुलकर व ब्रायन लारा यांच्या तुलनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला वकारने भारतीय खेळाडू सरस असल्याचे म्हटले. लारामध्ये नैसर्गिक गुणवत्ता होती. त्याचा दिवस असल्यामुळे तो धोकादायक खेळाडू होता. कर्णधार व प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीदरम्यान मी कधीच शिस्तीबाबत ढील दिली नाही.

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय