Join us
Daily Top 2Weekly Top 5

कन्यारत्नाच्या प्राप्तीनंतर विराट-अनुष्का प्रथमच आले माध्यमांसमोर, पहा VIDEO

virat-Anushaka News : कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत.

By बाळकृष्ण परब | Updated: January 21, 2021 14:53 IST

Open in App
ठळक मुद्देघरी कन्यारत्न आल्यानंतर आठवडाभरानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर माध्यमांसोर आल्यावर त्यांनी काही काळ फोटोसेशन केले आणि उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारल्या ११ जानेवारी रोजी विराटने ट्विट करून अनुष्का शर्माने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची माहिती दिली होती

मुंबई - कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत. ११ जानेवारी रोजी विराटने ट्विट करून अनुष्का शर्माने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची माहिती दिली होती. तसेच या काळात आपली प्रायव्हसी जपावी, अशी विनंती विराट कोहलीने केली होती.घरी कन्यारत्न आल्यानंतर आठवडाभरानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे क्लिनिकमध्ये गेले होते. त्यादरम्यान, माध्यमांनी त्यांना गाठले. यावेळी विराटने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि ट्राउजर परिधान केला होता. तर अनुष्का शर्माने ब्लू डेनिम जिन्स आणि शर्ट परिधान केला होता. माध्यमांसोर आल्यावर त्यांनी काही काळ फोटोसेशन केले आणि उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारून ते निघून गेले. दरम्यान, मुलीच्या जन्मानंतर विराट कोहली याने आपल्या ट्विटरचा बायो बदलला आहे. एक गौरवशाली पती आणि पिता असे त्याने आपल्या बायोमध्ये म्हटले आहे. विराटचा हा नवा बायो चाहत्यांना खूप पसंत पडत आहे. तसेच त्यासाठी विराटचे कौतुकही होत आहे.घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याची चाहूल लागल्यानंतर विराट कोहलीने क्रिकेटमधून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर तो मायदेशी परतला होता. मात्र आता कन्येच्या आगमनानंतर विराट पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मामुंबई